मुंबई : आज विधानसभेत विश्वासदर्शक ठरावात शिंदे-भाजप सरकारच्या बाजूने १६४ मते मिळाली असून हे सरकार बहुमताची परीक्षा उत्तीर्ण झाले आहे. तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली. यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विजयाची घोषणा केली. भाजपा आणि शिंदे गटाला बहुमत मिळाल्यानंतर अनेक नेत्यांनी सभागृहात अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. यावेळी सभागृहात बोलताना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
यावेळी गुलाबराव पाटील सभागृहात चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर नाव न घेता जोरदार निशाणा साधला. चार लोकांच्या कंडोळ्यानं उद्धव साहेबांना बावळट केलं, चार मतं घ्यायची लायकी नाही याची आणि आम्हाला डुक्कर बोलतात. डुकरांची मत घेऊन तुम्ही निवडून आलात. हे कोण सहन करणार आहे. आम्हाला मंत्री केलं हे उपकार आहेत, असं देखील ते म्हणाले.
तसेच यावेळी बोलताना त्यांनी भास्कर जाधवांना देखील सल्ला दिला. भास्कर जाधव यांनी चिंता कऱण्याची गरज नाही. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना जिवंत ठेवणार आहोत. आम्हाला गटारीचं पाणी, प्रेतं अशा धमक्या देण्यात आल्या. आम्ही काही लेचेपेचे नाही. हातात जोर असणारा माणूस येतो आणि सत्तेत सामील होतो असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला. शिवसेना संपत असेल तर ती वाचवण्याची जबाबदारी आमची आहे, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

