Share

Gulabrao Patil : अजित दादा आम्ही शिवसेना सोडली नाही, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका – गुलाबराव पाटील

Published On: 

मुंबई : विधानसभेचे अध्यक्ष पद जिंकत शिंदे-भाजप सरकार पहिल्या परीक्षेत पास झालं. यादरम्यान आज विधानसभेत शिंदे-भाजप सरकारकडून विश्वासदर्शक ठराव मांडला गेला. हा ठराव शिंदे-भाजप सरकारने बहुमताने जिंकला आहे. नव्या शिंदे सरकारला बहुमत सिद्दध करता आल्याने आता सरकारवर शिक्कामोर्तब झाला आहे. यादरम्यान शिवसेनेतील बंडखोर नेते व एकनाथ शिंदे गटातील गुलाबराव पाटील यांनी एक मोठे विधान केले आहे. त्यांनी हे विधान अजित पवार यांना उद्देशून केले आहे.

‘आम्ही बंड केलेला नाही उठाव केला आहे. आज माझ्या सारख्या माणसाला म्हणतात गुलाबराव तुम्हाला टपरीवर पाठवीन. रिक्षा चालवणारा, चहा विकणारा ज्यांना काही काम नव्हतं त्यांना नेता केलं. आता जे शिवसेना सोडून जातात ते पुन्हा निवडून येत नाही असे दादा म्हणाले. पण दादा आम्ही शिवसेना सोडली नाही त्यामुळे तुम्ही काळजी करू नका.’ अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी अजित पवार यांना उत्तर दिले. ‘आमचा साधा मेंबर जरी फुटतो तेव्हा आम्ही विचार करतो. चाळीस आमदार फुटले ही आजची आग नाही, अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी आपली भावना व्यक्त केली.

दरम्यान आजच्या अधिवेशनाला काँग्रेसचे अनेक आमदार उपस्थित नसल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेसकडून अशोक चव्हाण, प्रणिती शिंदे, विजय वडेट्टीवार असे मोठे नेतेही आज अनुपस्थित होते तर काँग्रेसचे धीरज देशमुख हे सभागृहात उपस्थित होते. सभागृहात शिंदे-भाजप सरकार बहुमताने विजयी झाले. हे मतदान झाल्यानंतर शिवसेनेचे आदित्य ठाकरे व इतर काही आमदार मध्येच सभागृहामधून बाहेर निघून गेले. त्यामुळे आता राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!