Share

ENG vs IND : विराट कोहली स्वस्तात बाद; झहीर खान म्हणतो, “मी त्याच्या…”

Published On: 

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत (ENG vs IND) भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला. एजबॅस्टन कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावातही त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहली एका चांगल्या चेंडूवर आऊट झाला आणि त्यामुळेच त्याचा जास्त विचार करू नये, असे तो म्हणाला.

एजबॅस्टन कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात विराट कोहलीने ४० चेंडूत २० धावा केल्या. तो चांगली फलंदाजी करत होता आणि फलंदाजीदरम्यान त्याने चार चौकारही मारले होते. मात्र, बेन स्टोक्सच्या एका सुरेख चेंडूवर तो स्लिपमध्ये बाद झाला. स्टोक्सचा हा चेंडू जबरदस्त होता आणि याच कारणामुळे कोहलीला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.

झहीर खान म्हणाला, ”विराट कोहलीला खूप चांगला चेंडू होता. मी त्याच्या विकेटचे वर्णन असेच करेन. तुम्ही चांगल्या चेंडूवर बाद झालात तर जास्त विचार करू नये, यावर माझा नेहमीच विश्वास आहे. विराट कोहली खूप चांगला खेळत होता आणि सकारात्मक फलंदाजी करत होता. त्याच्याकडे चांगले फूटवर्क होते आणि त्याने काही उत्कृष्ट ड्राइव्ह खेळले. त्या चेंडूवर तो काही करू शकला नाही. एखाद्या गोलंदाजाने तुम्हाला चांगल्या चेंडूवर बाद केले तर तुम्ही काय विश्लेषण कराल? तुम्ही गोलंदाजाला श्रेय दिले पाहिजे.”

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!