मुंबई : कालपासून सुरू झालेल्या दोन दिवशी अधिवेशनात सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिंदे-भाजप सरकारने बाजी मारली. त्यानंतर या सरकारने आज विधिमंडळात विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला आहे. या ठरावानंतर सभागृहात सर्व पक्षांच्या नेत्यांची भाषणे झाली. यादरम्यान राष्ट्रवादीचे माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर टीका करत तुफान फटकेबाजी केली. अजित पवारांच्या या भाषणाला प्रत्युत्तर देताना भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी चांगलाच समाचार घेतला. हे सरकार स्थापन होताना खरे तर अजित पवारांचे धन्यवाद मानले पाहिजेत, कारण त्यांनी या सरकारला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या मदत केली आहे.’ असा टोला यावेळी मुनगंटीवार यांनी लगावला.
अजित पवारांच्या भाषणाला उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले की, “ही सत्ता येताना अजित पवारांना धन्यवाद दिलं पाहिजे त्यांचही अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी यामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत केली. पण आजच्या भाषणात मात्र तुम्ही इकडे गेलात आता तुम्ही कसे निवडून याल? असं विचारतात. पण तुम्ही २३ नोव्हेंबर २०१९ ला तिकडून इकडे आले आणि उपमुख्यमंत्री झाले तोच तुमचा आदर्श आहे”
पक्षात बंड पुकारल्याने किंवा इकडून तिकडे गेल्यानं पराभूत होत नाही, तुम्ही गेले नाहीत म्हणून उपमुख्यमंत्री झाले नाहीत. पण हे लक्षात ठेवा कधीतरी अशी उडी मारावी लागते, हे कायम लक्षात ठेवा. असे विरोधकांना उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले.
शिंदे भाजप-सरकार एक एक पाऊल पुढे सरकताना दिसत आहे. कालच्या अधिवेशनामध्ये या सरकारने विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बाजी मारली. तर आज हे सरकार विश्वास दर्शकठरावात बहुमताने विजयी झाले. काल झालेल्या निवडणुकीत विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकर हे निवडून आले होते. ते देशातील सर्वात कमी वयात विधानसभा अध्यक्ष बनले आहेत.
महत्वाच्या बातम्या :


