Share

Utkarsh Shinde : “माणसात देव असतो ऐकलं होतं अन्…”, उत्कर्ष शिंदेची ‘ती’ इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत

Published On: 

मुंबई : आजचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक उत्कर्ष शिंदे आहे. उत्कर्ष शिंदे कायम कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. उत्कर्ष सध्या त्याच्या कामानिमित्त मारापूर गावामध्ये शूटिंग करत आहे. सध्या तो या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकतंच उत्कर्षने मारापूर गावातील शूटिंग करतानाच अनुभव सांगितला आहे.

उत्कर्षने नुकतंच त्याच्या इंस्टाग्रामवरून एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्याने कॅप्शन मध्ये लिहिले की, “माणसात देव असतो ऐकलं होत काल देवाच दर्शन घडल.”

शूटिंग साठी आम्ही मंगळवेढे माझ्या गावा नजीक मारापूर येथे शूट करत होतो.संध्याकाळ झाली,सूर्य प्रकाश मंदावला होता .आऊटडोर म्हंटलं कि चाहते आलेच सर्वाना भेटून सर्व सांभाळत शूट सुरु होत आणि त्यातच पाऊस धो धो पडू लागला .कॅमेरा ,ड्रोन ,गिम्बल पावसात कसबस सांभाळत पॅक अप केलं .परत रिसॉर्ट वर पोहोचलो आणि सर्वाना ओढ लागली मुंबई परतीची .सर्वजण बॅगपॅक करतच होतो कि कानी आवाज पडला “सर कॆमेराची लेन्सकिट कुठे सापडत नाहीये.सर्वांची शोधा शोध सुरु झाली.2 लाखाच्या लेंस ची किट कोणालाच सापडत न्हवता.

9:30 झाले.अंधारात परत लोकेशन च्या ठिकाणी जाऊन काही टॉर्च मारत तर काहीनि गाड्या ब्यागा 4-4वेळेस झटकून पाहिल्या. केमेरा,प्रॉडक्शंन,अससिस्टन्ट टिम ,ते स्पॉट बॉय तर रडायलाच लागले .लेंस कुठेच सापडेना. मग अखेरीस मी शकलं लढवली दोघांना घेऊन लोकेशन कडे निघालो.खेडंगाव असल्या मुळे क्वचित घरं आणि जी गर्दी शूट बघायला आली होती ती त्याच घरांन पैकी असावी असा अंदाज लावला. म्हंटलं हा परियाय वापरून बघावा. मग एका घराकडे पोहोचलो. माझ्या टिम मधील दोघे त्या घरा कडे जाऊन विचारपूस करू लागले गेले.

“तुमच्या पैकी कोणी त्या तिथे शूटिंग सुरु असताना होते का किंवा कोणाला काही वस्तू सापडल्या का ?असे विचारतच होते.कि एक शेतकरी मुलगा चिखलातून वाट काढत समोर आला आणि म्हणाला “तुम्ही शूटिंग वाले का ?”. मी झाडाखाली थांबून शूटिंग बघत होतो तिथे उत्कर्ष शिंदेंना पाहिलं. साहेब तुमची एक वस्तू तिकडेच विसरली वाटतं. ती मी माझ्या कडे जपून ठेवली आहे. माझा एक मित्र उत्कर्ष शिंदेंचे फोटो रोज स्टेट्सला ठेवत असतो मी त्याला संपर्क केला. काही संपर्क सापडतोय का बघायला म्हणजे तुमची वस्तू पोहोचवता आली असती. आता तुम्हीच आलात तर तुमची वस्तू घेऊन जावा.

शिंदें साहेबानची भेट होईल का? मी त्यांचा चाहता आहे अस म्हणताच,माझी टिम तडक त्याला माझ्या कडे घेऊन आलली .घडलेला प्रकार मला सविस्तर सांगितलं.मी त्याला त्याचे नाव विचारले ,म्हणाला सोमनाथ नराळे मी हि मग गळा भेट घेत, त्याचा कौतुक केलं जाता जाता त्याच्या सोबत फोटो हि काढले. लाखोंची केमेरा लेंस परत सापडली म्हणून माझी टिम आनंदाने नाचत होती .तर तो बिचारा मला भेटला म्हणून किती खुश झाला.आणि मी मात्र सुनं झालो,विचारात पडलो. ह्या दोघांन पैकी कोणाचा आनंद मोठा ?. टिमचा कि मला भेटला म्हणून त्या शेतकऱ्याचा ?इमानदारी ,निखळ प्रेम ,थोर संस्कार.काल त्या गरीब शेतकरी मुलात मी सर्वात श्रीमंत व्यक्ती पाहिला .माणसात देव असतो ऐकलं होत काल देवाच दर्शन घडल., असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

https://www.instagram.com/p/CfjnNyFPxYA/

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!