Share

राष्ट्रवादीचा छोटूसा भोंगा आठवतोय का कुणाला?; अमेय खोपकरांनी मिटकरींना पुन्हा डिवचले

Published On: 

मुंबई: मनसे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) आणि राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्यातील शाब्दिक चकमक काही नवीन नाही. काही दिवसांपूर्वीच शिवजयंती वरून या दोघांत शाब्दिक कलगीतुरा पहावयास मिळाला होता. आज पुन्हा एकदा अमेय खोपकर यांनी ट्वीट करत मिटकरी यांना थेट राष्ट्रवादीचा छोटूसा भोंगा म्हणून डिवचले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भोंग्यावरील वक्तव्य सध्या जाम चर्चेत आहे. त्यात अमेय खोपकर यांनी मिटकरी यांनाच भोंग्याची उपमा दिल्याने यांच्यात वाद अजून चिघळण्याची शक्यता आहे.

“राष्ट्रवादीचा छोटूसा भोंगा आठवतोय का कुणाला? अबब..केवढं ते भाषेचं तेज पण ती सगळी निघाली बोलाचीच कढी. असेल धमक तर पुन्हा चुरुचुरु बोलून दाखवा की राव. पेंग्विन पण तिथेच आहे आणि मातोश्री पण तिथेच आहे… जिजामाता उद्यानात रंग बदलणाऱ्या या सरड्यासाठी वेगळं दालन करणार आहेत म्हणे.”, असा टोला अमेय खोपकर यांनी ट्वीट करत लगावला आहे.

या व्हिडिओमध्ये अमोल मिटकरी मंत्री आदित्य ठाकरे यांची नक्कल करताना दिसून येत आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे. मात्र आज शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे सरकार आहे. यावरूनच रंग बदलणारा सरडा अशी उपमा देत अमेय खोपकर यांनी अमोल मिटकरी यांना पुन्हा असे चुरुचुरु बोलून दाखवा असे आव्हान दिले आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी अमेय खोपकर यांनी तिथीनुसार शिवजयंती साजरी करायला जो आडकाठी आणतो, जो या मुद्द्याचंही किळसवाणं राजकारण करतो अशा राष्ट्रवादीच्या फालतू आमदाराला भर चौकात फटके मारायला पाहिजेत, असे ट्विटद्वारे म्हटले होते. यावर मिटकरी यांनी “माझ्या सवे लढाया वाघास बोलवा रे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही”, अशा शब्दात अमेय खोपकर यांचं नाव न घेता प्रत्युत्तर दिलं होते. आता राष्ट्रवादीचा भोंगा म्हणून डिवचल्यानंतर मिटकरी याला काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या:

IPL 2022: ‘शॉने आमच्यासाठी काम सोपे केले’; सामना विजयानंतर क्विंटन डी कॉकचे मोठे वक्तव्य

“मुंबई केंद्रशासित करण्याचे सोमय्या आणि भाजपचे षडयंत्र”, संजय राऊतांचा मोठा दावा

IPL 2022: ‘त्याने मला बाल्कनीत लटकवलं आणि…’ मुंबईच्या खेळाडूबाबत युझवेंद्र चहलाचा धक्कादायक खुलासा!

विजय सत्याचाच होईल! संजय राऊत यांचा पुन्हा भाजपला इशारा

IPL 2022: लखनऊकडून पराभवानंतर ऋषभ पंत निराश, म्हणाला ‘शेवटच्या चेंडूपर्यंत…’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!