Share

IPL 2022: ‘त्याने मला बाल्कनीत लटकवलं आणि…’ मुंबईच्या खेळाडूबाबत युझवेंद्र चहलाचा धक्कादायक खुलासा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारतीय लेग-स्पिनर युझवेंद्र चहलने आयपीएलच्या सहाव्या आवृत्तीत मुंबई इंडियन्सकडून खेळत असताना घडलेल्या एका भयानक घटनेबद्दल नुकताच खुलासा केला. अश्विनसोबत बोलताना युझीने त्याच्यासोबत २०१३ ,मध्ये घडलेल्या त्या भयावह घटनेबाबत आता माहिती दिली आहे.

राजस्थान रॉयल्सचे (RR) सहकारी रविचंद्रन अश्विन (R Ashwin) आणि करुण नायर (karun nayar) यांच्यासमवेत बोलताना चहलने (yuzvendra chahal) सांगितले की कसे मद्यधुंद मुंबई इंडियाच्या खेळाडूने त्याला हॉटेल इमारतीच्या १५ व्या मजल्यावर बाल्कनीबाहेर लटकवले होते आणि त्याचा जीव जाता जाता वाचला होता. युझीने सांगितले, “मी ही गोष्ट आतापर्यंत कधीच सांगितली नाही. आजपासून सर्वांना कळेल. ही २०१३ची गोष्ट आहे जेव्हा मी मुंबई इंडियन्ससोबत (MI) होतो. तेव्हा आमचा बंगळुरूमध्ये सामना होता. त्यानंतर एक मेळावा झाला.”

युझीने पुढे सांगितले, “तर एक खेळाडू होता जो खूप मद्यधुंद होता. मी त्याचे नाव सांगणार नाही. तो खूप मद्यधुंद झाला होता, तो माझ्याकडे बराच वेळ पाहत होता आणि त्याने मला बोलावले आणि त्याने मला बाहेर नेले आणि मला बाल्कनीत लटकवले आणि माझे हात त्याच्या डोक्यामागे होते. जर तो हात जराही निसटला असता तर मी सरळ १५व्या मजल्यावरून पडून मेलो असतो.” युझीच्या या खुलास्याने खळबळ माजली आहे. तर त्याला बाल्कनीत लटकवणारा खेळाडू अँड्रयू सायमंड्स (Andrew symonds) होता अशी बातमी समोर आली आहे.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!