मुंबई: ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सला (DC vs LSG) हंगामात सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर दिल्ली संघाला लखनऊचे आव्हान होते, त्यासमोर दिल्ली प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरताना दिसली. या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने विरोधी संघाला १५० धावांचे लक्ष्य दिले होते, जे लखनऊने ६ गडी राखून सहज गाठले.
लखनऊ विरुद्ध मिळालेल्या पराभवानंतर दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत (rishabh pant) म्हणाला, “मैदानावर असे दव असताना तुम्ही तक्रार करू शकत नाही, आम्ही फलंदाजीत १० – १५ धावा कमी केल्या. शेवटी लखनऊच्या आवेश (Avesh khan) आणि होल्डरने शानदार गोलंदाजी केली, याचे श्रेय त्यांना जाते. ४० व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत आम्ही आमचे १००% देण्याचा प्रयत्न करत होतो, पॉवरप्लेमध्ये आम्हाला विकेट मिळाल्या नाहीत परंतु आमच्या फिरकी गोलंदाजांनी मधल्या षटकांमध्ये चांगली कामगिरी केली.”
आयपीएल २०२२ मधील दिल्ली कॅपिटल्सचा हा दुसरा पराभव आहे, ऑन पेपर मजबूत दिसणाऱ्या या संघाकडून अशा कामगिरीची अपेक्षा कोणीही केली नव्हती. विशेषत: संघाच्या फलंदाजांकडून चांगल्या खेळीची प्रतीक्षा अजूनही कायम आहे.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022: लखनऊची विजयी घोडदौड सुरुच! दिल्लीवर ६ विकेट्सने मात
- “महात्मा सोमय्या आकड्यांचा खेळ नंतर खेळुयात अगोदर…”, संजय राऊतांचा सवाल
- “खोटे स्टॅम्प पेपर छापून आणि रेशनचे तांदूळ ढापून…”, भातखळकरांचा भुजबळांना टोला
- “मुंबई पोलीस बारमध्ये येऊन झोपतात, महिला…”, चित्रा वाघ यांचा गृहमंत्र्यांना संतप्त सवाल
- “दुसरो को खामखा बदनाम करनेवाले…”, संजय राऊतांचा ट्वीट करत इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

