🕒 1 min read
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) काल (७ एप्रिल) मुंबईत दाखल झाले. ईडीने संपत्ती जप्त केल्यानंतर ते काल मुंबईत विमानतळावर दाखल होताच शिवसेनेकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तसेच भाजप नेते किरीट सोमय्या (kirit Somaiya) यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संजय राऊतांच्या फोटोसह पोस्टरबाजी करताना शिवसैनिक दिसून आले. आता त्यांनी पुन्हा एकदा ट्वीट करत भाजपला इशारा दिला आहे.
“जय महाराष्ट्र ही शिवसेना आहे. काल मुंबई विमानतळावर शिवसैनिकांनी विश्वास आणि प्रेमाचा वर्षाव केला. विजय सत्याचाच होईल!”,असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे. दरम्यान संजय राऊत विमानतळावर पोहोचण्याच्या आगोदरच मोठ्या संख्येने शिवसैनिक विमानतळावर दाखल झाले होते. संजय राऊत दाखल होताच त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी शिवसैनिकांच्या हातात ‘योद्धे’ असे फलक संजय राऊत यांच्या फोटोसह दिसून आले. त्यानंतर शिवसेनेची ही रॅली निघाली.
संजय राऊतांवरील ईडी कारवाई, शरद पवार-नरेंद्र मोदी भेट आणि संजय राऊतांचा INS विक्रांतसंबंधी खुलासा याने राज्यातील अनेक घडामोडींना वळण दिले. ठाकरे सरकार विरोधी भाजप असा संघर्ष आता पुन्हा सुरु झाला आहे. यात मनसेनेही आपली प्रतिक्रिया देत उडी घेतली आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण सध्या तापताना दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022: लखनऊकडून पराभवानंतर ऋषभ पंत निराश, म्हणाला ‘शेवटच्या चेंडूपर्यंत…’
IPL 2022: लखनऊची विजयी घोडदौड सुरुच! दिल्लीवर ६ विकेट्सने मात
“महात्मा सोमय्या आकड्यांचा खेळ नंतर खेळुयात अगोदर…”, संजय राऊतांचा सवाल
“खोटे स्टॅम्प पेपर छापून आणि रेशनचे तांदूळ ढापून…”, भातखळकरांचा भुजबळांना टोला
“मुंबई पोलीस बारमध्ये येऊन झोपतात, महिला…”, चित्रा वाघ यांचा गृहमंत्र्यांना संतप्त सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
