🕒 1 min read
मुंबई: IPL 2022 च्या १५ व्या सामन्यात क्विंटन डी कॉकने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध जोरदारखेळी केली. त्याने या सामन्यात ८० धावांची खेळी करत लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली. या खास खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. ज्यानंतर त्याने या विजयाचे श्रेय दिल्लीच्या पृथ्वी शॉला (Prithvi shaw) देत काम सोपे केल्याचे विधान केले आहे.
सामनावीर ठरलेला क्विंटन डी कॉक (Quinton de kock) म्हणाला , “तुमच्यासमोर जे काही चालले आहे त्यावर प्रतिक्रिया देण्याची ही बाब होती. ही एक पाठलाग करण्यायोग्य धावसंख्या होती. आम्हाला पॉवरप्लेमध्ये चांगली सुरुवात करायची होती आणि आम्ही पाठलाग करताना फार पुढे जाऊ इच्छित नव्हतो. विकेट हातात ठेवणे महत्त्वाचे होते. पृथ्वीने ते सोपे केले, मलाही वाटले की ही एक संथ पीच आहे आणि चेंडू पकड घेत आहे. आम्ही १८० धावांचा पाठलाग केला असता तर ते कठीण झाले असते, पण आमच्या गोलंदाजांचे त्यासाठी आभार मानतो.”
दिल्ली कॅपिटल्सच्या (DC) १५० धावांचा पाठलाग करताना ८० धावांची जबरदस्त इनिंग खेळल्यानंतर क्विंटन डी कॉकला २ फायदे मिळाले. या अप्रतिम खेळीमुळे त्याने ऑरेंज कॅपच्या शर्यतीत शानदार एंट्री केली असून थेट दुसऱ्या क्रमांकावर कब्जा केला आहे. यासह, सामना संपल्यानंतर त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- “मुंबई केंद्रशासित करण्याचे सोमय्या आणि भाजपचे षडयंत्र”, संजय राऊतांचा मोठा दावा
- IPL 2022: ‘त्याने मला बाल्कनीत लटकवलं आणि…’ मुंबईच्या खेळाडूबाबत युझवेंद्र चहलाचा धक्कादायक खुलासा!
- विजय सत्याचाच होईल! संजय राऊत यांचा पुन्हा भाजपला इशारा
- IPL 2022: लखनऊकडून पराभवानंतर ऋषभ पंत निराश, म्हणाला ‘शेवटच्या चेंडूपर्यंत…’
- IPL 2022: लखनऊची विजयी घोडदौड सुरुच! दिल्लीवर ६ विकेट्सने मात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
