Share

“मुंबई केंद्रशासित करण्याचे सोमय्या आणि भाजपचे षडयंत्र”, संजय राऊतांचा मोठा दावा

Published On: 

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी आज मोठा दावा केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि भाजपच्या काही लोकांचे मुंबई केंद्रशासित करण्यासाठी मोठे षडयंत्र सुरु असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. मुंबई केंद्रशासित कशी करता येईल यासाठी भाजपच्या पाच लोकांना सादरीकरण तयार केलं असून ते गृहमंत्रालयाला दिले आहे. मुंबईतील काही श्रीमंत ,भाजप नेते आणि बिल्डर यांच्या संगनमताने किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वात हे काम सुरु असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

मुंबई केंद्रशासित कशी करता येईल याचे सादरीकरण भाजपच्या पाच लोकांनी मुंबईत तयार केले आहे. या चोर, लफंग्याचं नेतृत्व किरीट सोमय्यांकडे असून मराठी माणसाचा हक्क आणि अधिकार त्यांना काढायचा आहे. मुंबई वेगळी करुन मुंबईवर केंद्राचं राज्य आणायचं असून किरीट सोमय्या हा लंफगा. चोर, महाराष्ट्रद्रोही हे सादरीकरण घेऊन दिल्लीत जात असतो. आजही त्यासाठी ते दिल्लीत गेले आहेत. असा दावा संजय राऊतांनी केला आहे. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते.

अगोदर मुंबई, महाराष्ट्राला बदनाम केलं जाणार आहे. हे षडयंत्र महाराष्ट्रासाठी मोठा धोका असून मुख्यमंत्र्यांनाही याची माहिती आहे. अ मी काही पेन ड्राईव्ह वैगेरे घेऊन फिरत नाही. मी बोलतोय ते सत्य आहे असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या:

IPL 2022: ‘त्याने मला बाल्कनीत लटकवलं आणि…’ मुंबईच्या खेळाडूबाबत युझवेंद्र चहलाचा धक्कादायक खुलासा!

विजय सत्याचाच होईल! संजय राऊत यांचा पुन्हा भाजपला इशारा

IPL 2022: लखनऊकडून पराभवानंतर ऋषभ पंत निराश, म्हणाला ‘शेवटच्या चेंडूपर्यंत…’

IPL 2022: लखनऊची विजयी घोडदौड सुरुच! दिल्लीवर ६ विकेट्सने मात

“महात्मा सोमय्या आकड्यांचा खेळ नंतर खेळुयात अगोदर…”, संजय राऊतांचा सवाल

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!