Share

धोनीने शेतात लावले गव्हाचे “हे” स्पेशल वाण!

Published On: 

🕒 1 min read

रांची : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी चं  पुन्हा एकदा ‘इजा फार्म हाउस’ नव्या पिकामुळे चर्चेत आलं आहे. धोनीने त्याच्या फार्म हाउस परिसरातल्या शेतात सुमारे एक एकर क्षेत्रात गव्हाच्या सुधारित वाणाची लागवड केली आहे. हे पीक आता जवळपास काढणीच्या अवस्थेत आलं आहे. धोनीने या गव्हाचं पीक स्वतःच्या घरगुती वापरासाठी लावलं असल्याची माहिती आहे.

धोनीने त्याच्या शेतात गव्हाचं नेमकं कोणतं वाण लावलं आहे, हे जाणून घेण्याची धोनीच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. या वाणाचं नाव ‘CRD गहू 1’ असं आहे.

CRD गहू 1 चे वैशिष्ट्यं –

१) गव्हाच्या या जातीत झिंकचं प्रमाण 42 PPM असते. गव्हाच्या इतर जातींमध्ये झिंकचं प्रमाण 32 PPM असतं.
२) या जातीच्या गव्हाच्या रोपांची मुळं मजबूत असल्याने रोपं पडण्याची शक्यता कमी असते.
३) या जातीच्या गव्हाच्या ओंब्यांमधली दाण्यांची संख्या इतर जातींच्या तुलनेत दीडपट अधिक असते.
४) या गव्हाचा दाणा आकारानं मोठा असतो.
५) याच्या एक हजार दाण्यांचं वजन 56 ग्रॅम असते. तर अन्य जातीच्या गव्हाच्या एवढ्याच दाण्यांचं वजन 46 ग्रॅम असतं.
६) या जातीमध्ये एक एकर क्षेत्रावर पेरणीसाठी 55 किलो बियाणं लागतं.
७) 20 नोव्हेंबर ते 20 डिसेंबरदरम्यान या गव्हाची पेरणी होते.
८) बागायती गव्हाला 5 वेळा सिंचनाची गरज असते. हे पाणी 20 दिवसांच्या अंतरानं द्यावं लागतं.

काला जीरा तांदळाची लागवड –

महेंद्रसिंह धोनीने गेल्या वर्षी त्याच्या फार्म हाउसमध्ये काळा जीरा नावाच्या तांदळाच्या जातीची लागवड केली होती. ही जात इतकी लोकप्रिय झाली, की अनेकजण त्या जातीला धोनी जीरा तांदूळ या नावाने ओळखू लागले. त्यामुळे साहजिकच धोनीने या खास गव्हाची लागवड केल्यानंतर इतर शेतकरीही त्यातून प्रेरणा घेतीलचं.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!