पुणे : रघुनाथ कुचिक पुण्यातील या शिवसेना नेत्यावर बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी चित्रा वाघ आज पुणे दौऱ्यावर आल्या आहेत. याप्रकरणातील पीडित मुलगी सध्या बेपत्ता आहे असा दावा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. पण ती मुलगी तिच्या वडिलांकडे सुखरुप आहे अशी खोटी माहिती पुणे पोलीस देत आहेत, असा आरोप चित्रा वाघ यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या, “अत्याचारानंतर पीडित मुलीला चार रुग्णालयांमध्ये गर्भपातासाठी मंगेशकर आणि हिरेमठ रुग्णालयात तिला नेण्यात आलं होतं या ठिकाणची चौकशी अजुन बाकी आहे, तिथे पुणे पोलीस अजून गेलेलेच नाहीत. या पीडितेला रुग्णालयात ज्यांनी नेलं त्याचं नाव राहुल गोयल आणि राहुल बोरा असं आहे. राहुल गोयल हा रुबी हॉस्पिटलचा स्टाफ आहे. तर दुसरा राहुल बोरा याचा जबाब अद्याप घेण्यात आलेला नाही. मुलगी अद्याप गायब आहे, 16 तारखेला आरोपी कुचिकवर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच या घटनेतील स्पॉट पंचनामे आणि इतर पुरावे सगळं देऊन सुद्धा आवश्यक गतीनं पोलीस या प्रकरणाकडं पाहत नाहीत,पोलीस नक्की कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत? असा सवालही वाघ यांनी केला आहे.
पुणे पोलिसांकडून दिशाभूल करण्याचं काम सुरु आहे. मुलगी वडिलांसोबत नाही, अशी माहिती मला स्वतः वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. पण तरीही महिला आयोगाच्या अध्यक्षा मुलगी तिच्या कुटुंबियांसोबत असल्याचं सांगत आहेत. या प्रकरणात योग्य प्रकारे लक्ष न घालता बेताल वक्तव्य केली जात आहेत. मुलगी मिळालेली नाही, तीचे वडील त्यांच्या गावी आहेत. केवळ मुलीचं लोकेशन मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे, असेही चित्रा वाघ यांनी सांगितलं. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी सत्ताधारी पक्षाचा आहे, त्यामुळं सरकारला हे प्रकरण गांभीर्यानं घ्यायचंच नाहीए का? असा सवालही त्यांनी विचारला.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
