Share

नीतू कपूरने दिल्या आलियाला खास शुभेच्छा; पहा काय म्हणाल्या नीतू

Published On: 

नवी दिल्ली: ‘गंगूबाई काठियावाडी’ फेम अभिनेत्री आलिया भट्ट आज 15 मार्च रोजी तिचा 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी तिच्यावर संपूर्ण बॉलिवूडमधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडपे आहेत. या दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. आलिया भट्टचे केवळ रणबीर कपूरसोबतच नाही, तर त्याची आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा साहनी यांच्याशीही खूप जवळचे आणि सुंदर नाते आहे. आलियाच्या वाढदिवसाच्या खास प्रसंगी नीतू कपूर यांनीही तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नीतू कपूर सोशल मीडियावर आलिया भट्टच्या चित्रपटाचे किंवा कोणत्याही प्रोजेक्टचे प्रमोशन करण्याची एकही संधी सोडत नाही. आज नीतू सिंहने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर आलिया भट्टसोबतचा एक अतिशय गोंडस फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत नीतू कपूर आलिया भट्टच्या डोक्यावर प्रेमाने डोके ठेवत आहे आणि दोघांनीही काळ्या रंगाचे टॉप घातले आहेत. फोटोमध्ये दोघीही खूप आनंदी दिसत आहेत. इन्स्टाग्राम स्टोरीवर हा फोटो शेअर करत नीतू कपूरने लिहिले की, ‘आतून आणि बाहेरून सर्वात सुंदर असलेल्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा’.

नीतू कपूरने तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केलेला हा फोटो री शेअर करून आलिया भट्टने लिहले कि, ‘लव्ह यू’. नीतू कपूरशिवाय रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा साहनी हिनेही आलिया भट्टसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत रिद्धिमा कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माझ्या सुंदर आलूला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्यावर खूप प्रेम आहे आलिया भट्ट’.

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!