Share

“पेन ड्राईव्ह प्रकरण म्हणजे नूरा कुस्ती”- प्रकाश आंबेडकरांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Published On: 

अहमदनगर: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या पेन ड्राईव्हवरून महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. सगळेच नेते आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “देवेंद्र फडणवीस यांनी नुरा कुस्ती खेळू नये. विधानसभा अध्यक्षांना पेन ड्राईव्ह देणे म्हणजे नुरा कुस्तीचा भाग आहे, फडणवीस यांनी खऱ्या पैलवानासारखा मैदानात येऊन लढावे असे आंबेडकर म्हणाले आहेत. फडणवीस यांनी 125 तासांचे व्हिडीओ जनतेसमोर आणून ते मैदानी पैलवान आहेत की नुरा कुस्तीतील पैलवान आहेत, हे दाखवून द्यावं, असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

कर्नाटक उच्च न्यायालयाने आज हिजाब बंदीच्या विरोधातील याचिकेवर निर्णय दिला. यावर प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया मागितली असता आंबेडकर म्हणाले कि, आता कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आलेला नाही. त्यामुळे मी माझी प्रतिक्रिया देणार नाही. अशी स्पष्ट भूमिका आंबेडकरांनी मांडली.

“शिक्षणाच्या मंदिराला धर्माचा आखाडा बनवू नये”, हिजाब प्रकरणी चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

“शिक्षणाच्या मंदिराला धर्माचा आखाडा बनवू नये. वर्गात निर्धारित गणवेशात जावे. माननीय कर्नाटक उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.”, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. दरम्यान कर्नाटकातील शाळेतील हिजाब बंदीवर कोर्टाकडूनही आता शिक्कामोर्तब झाले आहे. उडूपीच्या मुलींनी कोर्टात याचिका दाखल करून शाळेत हिजाब परिधान करण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती. कोर्टाने ही याचिका फेटाळून लावत विद्यार्थी शालेय गणवेश परिधान करून येण्यास नकार देऊ शकत नाहीत, असे म्हटले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!