Share

“हैदराबादी बिर्याणी खाणारे…”; उपमुख्यमंत्र्यांची असदुद्दीन ओवैसींवर खोचक टीका

Published On: 

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा यांनी रविवारी विरोधी पक्षांवर कडाडून हल्ला चढवला आणि बसपा, सपा जातीयवादी आणि काँग्रेस हा भांडण करून लोकांमध्ये फूट पाडणारा पक्ष असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्यावर देखील नाव न घेता खोचक टीका केली. सुलतानपूर जिल्ह्यातील कादीपूर तहसील मुख्यालयात असलेल्या पटेल चौकात भाजपच्या जनविश्वास यात्रेच्या सभेला ते संबोधित करत होते.

शर्मा म्हणाले की, “बसपा हा जातीवादी, सपा जातीयवादी आहे आणि काँग्रेस हा भांडण करून लोकांमध्ये फूट पाडणारा पक्ष आहे. भाजप हा सर्वांना एकत्र जोडून देशात शांतता निर्माण करणारा पक्ष असल्याचे ते म्हणाले. तसेच लोकांनी उमेदवाराऐवजी ‘कमळ’ (भाजपचे निवडणूक चिन्ह) लक्षात ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.”

असदुद्दीन ओवैसी यांच्यावर टीका करताना शर्मा म्हणाले, “हैदराबादी बिर्याणी खाणारे (असदुद्दीन ओवैसी) म्हणतात, योगी सत्तेतून बाहेर फेकले जातील. मात्र योगी उत्तर प्रदेशात २५ वर्षांहून अधिक काळ सत्तेत असतील.  सपा सरकारने गोरगरिबांच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा करून इमारती बांधल्या तर योगी सरकारने बेकायदा बांधकामांवर बुलडोझर चालवून ती पाडून गरिबांना संरक्षण दिले.”

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!