Share

मोठी बातमी! एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची बदली

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आर्यन खान ड्रग्स प्रकरणानंतर चर्चेत असलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची डिआरआयमध्ये बदली झाली आहे. त्यांचा एनसीबी कार्यकाळ संपल्याने त्यांची बदली करण्यात आली आहे. यापुर्वी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आरोपांचा सपाटा लावला होता. आता यातच त्यांची डिआरआयमध्ये बदली करण्यात आली आहे.

या अगोदर समीर वानखेडे डिआरआयमधूनच एनसीबीत आले होते. आता त्यांची पुन्हा एकदा डिआरआयमध्येच बदली करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांचे जावई समीर खान, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, अरमान कोहली, अशा अनेकांवर कारवाया होत्या. मात्र याच कारवायांमुळे ते नंतर अडचणीत आल्याचेही दिसले.

नवाब मलिक यांनी आरोप केल्यानंतर समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले. नवाब मलिक अजूनही अधूनमधून ट्वीट करत आरोप करत असतात. दरम्यान आता समीर वानखेडे यांची डिआरआयमध्ये बदली करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!