Share

पंकजा मुंडेंना कोरोना झाला तुम्ही त्यांना फोन केला का?, धनंजय मुंडे म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. यावेळी त्यांना ओमायक्रान या विषाणूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नुकतंच राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईमध्ये पार पडले. या अधिवेशना दरम्यान ५० पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली. त्याचबरोबर राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट म्हणजेच ओमायक्रॉनची रुग्णसंख्या देखील झपाट्याने वाढत आहे.

दरम्यान, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. त्यामुळे एकमेकांवर टीका करणाऱ्या भाऊ बहिणीचे कौटुंबिक प्रेम महाराष्ट्राने पाहिले. माध्यमांशी बोलतांना आपण पंकजा यांना मेसेज करून काळजी घेण्यास सांगितल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

धनंजय मुंडे यांना पत्रकारांनी पंकजा मुंडेंना कोरोना झाला आहे, तुम्ही त्यांना फोन केला का? असा प्रश्न विचारला. यावर धनंजय मुंडे म्हणाले. “मी पंकजाताईला फोन करू शकलो नाही, मात्र मेसेजद्वारे सांगितले की तुला दुसऱ्यांदा कोरोना झाला आहे. कोरोना काळात काळजी घेणे फार महत्त्वाचं असतं. विशेषतः पोस्ट कोविड त्रास जास्त असतो. अशावेळी काळजी घेणे गरजेचं आहे. त्यामुळे मी तिला मेसेज केला की काळजी घेण्याचे सांगितले.”

पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांची प्रकृती चांगली आहे. त्या मुंबईतील निवासस्थानी क्वारंटाईन आहेत. त्यामुळे काळजीचे कारण नसल्याचे पंकजा मुंडे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे या परभणीच्या जिंतूर तालुक्यातील धमधम इथं एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!