Share

आपल्यामुळे एसटीचे ९ लाखांचे नुकसान; प्रशासनाच्या नोटिसा पाहून कर्मचाऱ्यांना भोवळ..!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: ‘बेकायदेशीर आंदोलनात सहभागी होऊन आपल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाचे नऊ लाखांचे नुकसान झाले आहे त्यामुळे या नोटिशीला उत्तर द्यावे अथवा एकतर्फी निर्णय घेतला जाईल’ रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना रुजू झाल्यानंतर एसटी प्रशासनाकडून नुकसान भरपाईबाबत अशाप्रकारच्या नोटीस बजावण्यात येत आहेत. या नोटीसातील लाखोंची नुकसानभरपाई पाहून अनेकांना भोवळ येणेच बाकी राहिले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीवर ५ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत आम्ही आमच्या दुखवट्यावर ठाम असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

७ नोव्हेंबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. मात्र विलीनीकरणाच्या मागणीवर अडून बसलेल्या कर्मचाऱ्यांनी आत्तापर्यंत शासनाकडून देण्यात आलेली सर्व अमिषे नाकारत आपला लढा सुरुच ठेवला आहे. सेवा समाप्ती, निलंबन यामुळे काही प्रमाणात नवीन कर्मचारी रुजू झाले आहेत. मात्र रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून बजावण्यात आलेल्या नोटीसा सध्या आगारात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. या नोटीसा पाहून रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांनी आपण स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतल्याची भावना व्यक्त केली.

औरंगाबाद येथील सिडको आगारातील कर्मचाऱ्याला देण्यात आलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे, एसटीच्या सुरु असलेल्या बेकायदेशीर आंदोलनात आपण सहभागी झालेले आहात. आपण नियमबाह्य आंदोलनात सहभागी झाल्यामुळे एसटी नियमित मार्गावर धावु शकली नाही. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाचे गंभीर आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आपल्यामुळे एसटीचे ९ लाखांचे नुकसान झाल्याचा दावा प्रशासनाने या नोटीसात केला आहे. यास उत्तर न दिल्यास एकतर्फी निर्णय घेतला जाईल. असा धमकीवजा इशाराही या एसटी कर्मचाऱ्याला दिला आहे.

या संपूर्ण पार्श्वभूमीवर रुजू झालेल्या काही कर्मचाऱ्यांनी अशा नोटिसा पाहून पुन्हा एकदा माघार घेतली आहे. प्रशासन कर्मचाऱ्यांना कोंडीत पकडणार असेल तर आम्ही आमच्या विलिनीकरणाच्या मागणीवर अडून राहू. अशी भूमिका आता कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. मात्र अनेक नवीन आणि जुन्या कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या मतभेदामुळे नवीन कर्मचारी रुजू झाले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात एसटीच्या फेऱ्या सुरू झालेल्या आहेत. रविवारी (दि.२) १२८ बसेसच्या ३३७ फेऱ्या झाल्या. यातून ४२४४ प्रवाशांनी प्रवास केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!