🕒 1 min read
मुंबई : दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले काही महिने कोरोनाला ब्रेक लागला होता. परिस्थिती पूर्वपदावर येत होती. परंतु आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे राज्यात २४ डिसेंबरला रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु त्यानंतर कोरोना रुग्णसंख्येत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली असून ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील सातत्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्यात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत.
याच मुद्द्यावरून भाजप नेते आशिष शेलार(Ashish Shelar) यांनी कोरोनाचे जे नियम जनतेला लावताय तेच नियम मंत्री आणि सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पण पाळावेत, असे म्हंटले आहे. यासंदर्भात आशिष शेलार यांनी एक व्हिडीओ ट्विट केला असून ते म्हणाले आहेत की,’मुख्यमंत्री ठाकरेंना आमची विनंती आहे की, जे नियम सामान्य जनतेला सांगताय ते नियम तुम्ही पाळा हे म्हणण्याची वेळ आली आहे. अधिवेशन असलं की जास्त दिवस नको, कोरोनाची भीती आहे,’ असे हे सांगतात.
कोरोनाचे जे नियम जनतेला लावताय तेच नियम मंत्री आणि सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पण पाळावेत! @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/V6vbnhb1uP
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 3, 2022
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’अधिवेशन संपलं की हेच मंत्री हजारो आणि लाखोंचे कार्यक्रम लोकांना एकत्र करण्यासाठी करतात. कारण, तेव्हा कोरोना नसतो. मला या विषयावर राजकारण करायचं नाही पण तरी कोरोनाच्या बाबतीत आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लढायला हवं आणि नियम पाळावे इतकीच माझी विनंती आहे’, असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- ‘एकमेकाला ओरबाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजाला सावित्रीबाईंनी सत्कार्याचा आदर्श घालून दिला’
- युगायुगांच्या बेड्या तोडणाऱ्या सावित्रीबाई रणरागिणी होत्या- अमोल कोल्हे
- ‘सावित्रीबाईंनी जे कार्य केले,त्याचे मोजमाप कोणत्याच परिमाणात करता येणं अशक्य’
- ‘सुप्रिया सुळे थापा मारताय की हे सगळेच लोकप्रतिनिधी…’, भातखळकरांचा हल्लाबोल
- ‘अंधेर नगरी घरी बसला राजा’, म्हाडा आणि एमपीएससीच्या परीक्षेवरून भातखळकरांचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
