🕒 1 min read
औरंगाबाद :कोरोना विरुद्धची लढाई अजूनही सुरू आहे. याकरिता आपण सर्वांनी लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी लसीकरणासोबत कोविड नियमांचे पालन करणे सुद्धा गरजेचे आहे. त्यांनी आपल्या घरातील लसीकरण राहिलेल्या व्यक्तींना लसीकरणासाठी प्रवृत्त करावे असे आवाहन सोमवारी (दि.३) पालकमंत्री सुभाष देसाई यांनी १५ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना केले. शासन निर्देशानुसार आजपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना कोविड प्रतिबंधिक लसीकरणाची सुरुवात होत आहे. सोमवारपासून महानगरपालिकेतर्फे मनपा प्रियदर्शनी केंद्रीय विद्यालयात पालकमंत्री सुभाष देसाई(Subhash Desai) यांच्या हस्ते या मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
यावेळी आमदार अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट, माजी महापौर नंदकुमार घोडेले, मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय, शिक्षक कर्मचारी, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्री बाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यावेळी प्रशासक म्हणाले, आज घडीला महानगरपालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ आणि लसींची उपलब्धता आहे. नागरिकांनी आपल्या आरोग्य सुरक्षिततेसाठी आपले दोन्ही डोस पूर्ण करणे आवश्यक आहे. आज पर्यंत शहरातील नागरिकांचे ८२ ते ८५% लसीकरण झाले आहे.
लवकरच उर्वरित नागरिकांचे १०० % लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेतर्फे घरोघरी जाऊन लसीकरण सुरू करण्यात आले आहे. कमीत कमी काळात १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात येईल असे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी देसाईंनी लॉकडाऊन टाळणे आपल्या हातात आहे. त्याकरिता सर्व नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करून लवकरात लवकर आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे व प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रियदर्शनी शाळेतील पाच विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लसींचा पहिला डोस देण्यात आला. यावेळी शाळेतील ४० विद्यार्थ्यांना लस देण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
- …तर महाराष्ट्रातही बंगालसारखी स्थिती निर्माण होईल- विजय वडेट्टीवार
- “तुम्ही खरे की उद्धव ठाकरे?”; भाजपचा आदित्य ठाकरेंना सवाल
- विराट कोहली माध्यमांसमोर कधी येणार?; राहुल द्रविडने केला खुलासा
- प्रवीण दरेकरांचा तिन्ही पक्षांना ‘जोर का झटका धीरे से..!’, चित्रा वाघ यांचा टोला
- अभिनेता जॉन अब्राहम आणि पत्नी प्रियाला कोरोनाची लागण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
