Share

शरद पवारांकडे UPA चे अध्यक्षपद देण्याचा प्रस्ताव दिल्लीत मंजूर; राजकारणात मोठ्या घडामोडी

Published On: 

नवी दिल्ली: काल (२९ मार्च) दिल्लीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारदेखील उपस्थित होते. या बैठकीत शरद पवारांनी ( (NCP President Sharad Pawar)) संयुक्त पुरोगामी आघाडीचे (UPA) अध्यक्षपद भूषवावे यासाठी प्रस्ताव संमत करण्यात आला. आणि तो संमतही करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

काँग्रेस नेतृत्व करु शकत नाही असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचंचे म्हणणे आहे. शरद पवारच देशातील विरोधकांना एकत्र आणू शकतात आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपला रोखलं जाऊ शकतं असे या ठरावात म्हटले आहे. देशातील सध्याची राजकीय स्थिती पाहता शरद पवार यांनी काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांचे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करायला हवे. शरद पवार हे देशातील सध्याचे सर्वात अनुभवी नेते असून संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री म्हणून त्यांचे देशाच्या विकासातील योगदान मोठे आहे. या सर्व बाबी विचारात घेत त्यांच्याकडे विरोधी पक्षाचे नेतृत्व सोपवायला हवं. असे या ठरावात म्हटले आहे. दरम्यान यावर काँग्रेस आणि युपीएतील घटक पक्ष काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान “ज्या तरुणांना संघटनेची विचारधारा आणि उद्देश पूर्णपणे माहीत आहे, तो तरुण एक दिवस राजकारणात नक्कीच यशस्वी होईल.आपली विचारधारा गांधी-नेहरू, टिळक, सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद यांच्या विचारसरणीने प्रेरित आहे. या सर्व लोकांनी देशाला स्वतंत्र करण्यासाठी संघर्ष उभा केला. स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशाला नवी दिशा दाखवली. राष्ट्रवादी काँग्रेसची मूळ विचारधारा एकच आहे, फक्त काम करण्याची पद्धत वेगळी आहे.”,असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

Iयंदा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात होणार साजरी; ठाकरे सरकारचा निर्णय

देशात द्वेष आणि असत्यतेच्या राजकारणाच्या युगात तरुणांनी संघटित होणे गरजेचे- शरद पवार

‘म्होरक्या’ निलेश रसाळ यांचा मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात डंका! 

कात्रज परिसरात धक्कादायक घटना; तब्बल २५ गॅस सिलेंडरचा स्फोट

IPL 2022 : “सचिन, मी किंवा गौतमनं असे शॉट खेळले असते?”, सेहवागनं शुबमन गिलला सुनावलं!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!