मुंबई : भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने गुजरात टायटन्सचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलला फटकारले आहे. आयपीएल २०२२मध्ये लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात शुबमनला खातेही उघडता आले नाही. दुष्मंथा चमीराच्या चेंडूवर त्याने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण त्याची तो अपयशी ठरला.
शुबमन ज्या पद्धतीने हा शॉट खेळला, त्यावरून सेहवागला दु:ख झाले. क्रिकबझवरील संभाषणादरम्यान तो म्हणाला, “शुबमन स्पर्धेपूर्वी म्हणाला, होती की मी काही cheeky शॉट्स शिकलो आहे, परंतु त्याला असे शॉट्स खेळण्याची गरज नाही. जरी तो सामान्य क्रिकेट खेळला तरी तो संघाला चांगली सुरुवात देऊ शकतो. मागच्या हंगामात त्याचा स्ट्राईक रेट १२० होता, आता त्याने १५०च्या स्ट्राईक रेटने सुरुवात करून ऑफ ट्रॅक व्हावे, असे मला वाटत नाही. तो आयुष बदोनी आणि दीपक हुडाप्रमाणे सामान्य पद्धतीने खेळून स्ट्राइक रेट सुधारू शकतो.”
सेहवाग पुढे म्हणाला, “गिलला क्रीजवर उभे राहण्याची गरज आहे. तुम्ही ६०, ७० किंवा ८०वर पोहोचल्यावर स्ट्राइक रेट आपोआप वाढेल. इथे तुम्ही मुक्तपणे खेळू शकता. सचिन तेंडुलकर, मी, गौतम गंभीरने असे शॉट्स खेळले असते? अजिबात नाही.” आयपीएल २०२२च्या चौथ्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्सचा ५ गडी राखून पराभव केला.
महत्त्वाच्या बातम्या –
- IPL 2022 SRH vs RR : पुण्याच्या मैदानावर विल्यमसननं जिंकला टॉस; ‘असे’ आहेत दोन्ही संघ!
- “अनिल देशमुख महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात परत येतील”- अमोल मिटकरी
- सलमान म्हणाला,आमचे चित्रपट टॉलीवूडमध्ये का चालत नाही?
- ममता बनर्जींच्या पत्राबाबद लवकरच होणार बैठक; शरद पवारांचा खुलासा
- “…म्हणून सदाभाऊंच्या ** ला आग लागली असावी”- अमोल मिटकरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

