Share

देशात द्वेष आणि असत्यतेच्या राजकारणाच्या युगात तरुणांनी संघटित होणे गरजेचे- शरद पवार

Published On: 

मुंबई: पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात केंद्रीय यंत्रणांच्या धाडी पडतच आहेत. राज्यातील मविआ नेत्यांवरील ईडी कारवाईमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी थेट केंद्र सरकारवर निशाणा साधत टोला लगावला आहे. ते काल (२९ मार्च) राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत बोलत होते.

“आज देशात द्वेष आणि असत्यतेच्या राजकारणाच्या युगात तरुणांनी संघटित होणे अत्यंत गरजेचे आहे. काश्मिरी पंडितांचे निराकरण करण्याऐवजी केवळ युवा शक्तीच सत्य आणि एकतेच्या आधारे राजकीय फायदा मिळवणाऱ्या आणि सरकारी संस्थांचा गैरवापर करणाऱ्या लोकांशी स्पर्धा करू शकते. मला अभिमान वाटतो की, राष्ट्रवादी युवक काँग्रेस सर्वाना सोबत घेऊन चालण्याच्या विचारसरणीचा देशभरात प्रसार करत आहे.”, असे ट्वीट शरद पवार यांनी केले आहे.

तसेच “ज्या तरुणांना संघटनेची विचारधारा आणि उद्देश पूर्णपणे माहीत आहे, तो तरुण एक दिवस राजकारणात नक्कीच यशस्वी होईल.आपली विचारधारा गांधी-नेहरू, टिळक, सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद यांच्या विचारसरणीने प्रेरित आहे. या सर्व लोकांनी देशाला स्वतंत्र करण्यासाठी संघर्ष उभा केला. स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशाला नवी दिशा दाखवली. राष्ट्रवादी काँग्रेसची मूळ विचारधारा एकच आहे, फक्त काम करण्याची पद्धत वेगळी आहे.”, असेही शरद पवार म्हणाले आहेत. सध्या देशात ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरून चांगलेच राजकारण रंगले आहे. भाजपने हा चित्रपट म्हणजे कॉंग्रेसच्या काळात काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय, अत्याचार याचा ज्वलंत इतिहास आहे. तर काँग्रेस कडून मात्र या चित्रपटात सत्य दडवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. तसेच राज्यात ईडी धाडसत्र सुरूच असल्याने शरद पवारांनी या सर्व मुद्द्यांवरून केंद्राला टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या:

IPL 2022 SRH vs RR : राजस्थान रॉयल्सचा मोठा विजय; मार्कराम, सुंदरने राखली हैदराबादची लाज!

IPL 2022 SRH vs RR : धू-धू-धुलाईच..! पुण्यात घोंगावलं सॅमसन वादळ; हैदराबादला २११ धावांचं आव्हान!

‘म्होरक्या’ निलेश रसाळ यांचा मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात डंका! 

कात्रज परिसरात धक्कादायक घटना; तब्बल २५ गॅस सिलेंडरचा स्फोट

IPL 2022 : “सचिन, मी किंवा गौतमनं असे शॉट खेळले असते?”, सेहवागनं शुबमन गिलला सुनावलं!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!