Share

IPL 2022 SRH vs RR : धू-धू-धुलाईच..! पुण्यात घोंगावलं सॅमसन वादळ; हैदराबादला २११ धावांचं आव्हान!

Published On: 

पुणे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल २०२२चा सामना खेळला जात आहे. हैदराबादचा कप्तान केन विल्यमसनने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार संजू सॅमसनची तुफानी अर्धशतकी खेळी आणि देवदत्त पडिक्कलच्या महत्त्वपूर्ण ४१ धावांमुळे राजस्थानने हैदराबादला २११ धावांचे आव्हान दिले.

राजस्थानचा डाव

जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी राजस्थानच्या डावाची सुरुवात केली. हैदराबादचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारने पहिल्या १० मिनिटांतच बटलरला यष्टीपाठी झेलबाद केले होते, पण भुवनेश्वरने टाकलेला चेंडू नो बॉल होता. त्यामुळे बटलरला जीवदान मिळाले. बटलर-जयस्वालने पहिल्या गड्यासाठी ५८ धावांची भागीदारी रचली. रोमॅरियो शेफर्डने जयस्वालला (२०) बाद करत राजस्थानला पहिला धक्का दिला. त्यानंतर उमरान मलिकने बटलरला झेलबाद केले. बटलरने ३ चौकार आणि ३ षटकारांसह ३५ धावा केल्या. त्यानंतर देवदत्त पडिक्कल आणि कप्तान संजू सॅमसनने अर्धशतकी भागीदारी रचली. पडिक्कलने २९ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ४१ धावा ठोकल्या, उमरानने त्याचा त्रिफळा उडवला. संजूने आक्रमक अंदाजात अर्धशतक ठोकले. त्याने २७ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांसह ५५ धावा केल्या. १७व्या षटकात भुवनेश्वरने संजूला माधारी धाडले. शेवटच्या षटकात स्फोटक फलंदाज शिमरोन हेटमायरने १२ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह ३२ धावा कुटल्या, त्यामुळे राजस्थानला दोनशेपार धावा करता आल्या. २० षटकात रॉयल्स संघाने ६ बाद २१० धावा केल्या.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, केन विल्यमसन (कप्तान), निकोलस पूरन (यष्टीरक्षक), एडन मार्कराम, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन, उमरान मलिक.

राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक आणि कप्तान), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रवीचंद्रन अश्विन, नॅथन कुल्टर-नाईल, यजुर्वेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!