Share

यंदा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात होणार साजरी; ठाकरे सरकारचा निर्णय

Published On: 

मुंबई: कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीवर (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) सावट होते. मात्र यंदा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी होण्यार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. काल (२९ मार्च) सहयाद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. तसेच महापरिनिर्वाण दिनाप्रमाणेच १४ एप्रिल रोजी राज्यशासनामार्फत हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यास गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मान्यता दिली असून त्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.

१४ एप्रिल रोजी रोजी होणाऱ्या १३१ व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसंदर्भात काल सहयाद्री अतिथीगृह आयोजित बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्यप्रणालीव्दारे उपस्थित होते त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, “गेली दोन वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सव व पुण्यतिथीनिमित्त अभिवादन अशा दोन्हीही कार्यक्रमात आपण कोरोना निर्बंधांमुळे अतिशय संयम पाळला आणि नियमांचे काटेकोर पालन केले, ही खरोखरच खूप महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे. आता हे कोरोनाचे सावट कमी झाले आहे आणि या महामानवाची जयंती आपणा सर्वांना उत्साहाने साजरी करायची आहे. महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांनी नेहमीप्रमाणे संपूर्ण नियोजन व तयारी केली आहे. राज्यभरातदेखील उत्साहाने तसेच आरोग्याचे नियम पाळून हा उत्सव साजरा करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.”

दरम्यान आपण सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुयायी आहोत त्यामुळे जयंती उत्सवाच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना मुंबई महापालिका आणि राज्य शासनाच्यावतीने करण्यात येणार आहेत. राज्यशासनाच्यावतीने १४ एप्रिल बाबतच्या मार्गदर्शक सूचना आगामी चार दिवसात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. तसेच महापरिनिर्वाणदिनाप्रमाणे जयंती दिनी राज्य शासनाच्यावतीने चैत्याभूमी येथे हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टीच्या मागणी यावेळी मान्य करण्यात आल्याचेही वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

देशात द्वेष आणि असत्यतेच्या राजकारणाच्या युगात तरुणांनी संघटित होणे गरजेचे- शरद पवार

IPL 2022 SRH vs RR : राजस्थान रॉयल्सचा मोठा विजय; मार्कराम, सुंदरने राखली हैदराबादची लाज!

IPL 2022 SRH vs RR : धू-धू-धुलाईच..! पुण्यात घोंगावलं सॅमसन वादळ; हैदराबादला २११ धावांचं आव्हान!

‘म्होरक्या’ निलेश रसाळ यांचा मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात डंका! 

कात्रज परिसरात धक्कादायक घटना; तब्बल २५ गॅस सिलेंडरचा स्फोट

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!