पुणे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगलेल्या आयपीएल २०२२च्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादवर ६१ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात हैदराबादचा कप्तान केन विल्यमसनने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार संजू सॅमसनची तुफानी अर्धशतकी खेळी आणि देवदत्त पडिक्कलच्या महत्त्वपूर्ण ४१ धावांमुळे राजस्थानने हैदराबादला २११ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात वरची फळी उत्तम फलंदाजी करण्यात निष्प्रभ ठरल्यामुळे हैदराबादला २० षटकात १४९ धावांपर्यंतच पोहोचला आले. राजस्थानकडून प्रसिध कृष्णा आणि यजुर्वेंद्र चहल यांनी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत हैदराबादच्या विकेट मिळवल्या.
हैदराबादचा डाव
राजस्थानचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा आणि फिरकीपटू यजुर्वेंद्र चहल यांनी अप्रतिम गोलंदाजी करत हैदराबादची वरची फळी गारद केली. कप्तान केन विल्यमसन (२), राहुल त्रिपाठी (०) यांना प्रसिधने फसवले, तर अभिषेक शर्मा (९) आणि अब्दुल समद (४) यांना चहहलने तंबूचा मार्ग दाखवला. ३७ धावांत हैदराबादने ५ फलंदाज गमावले. त्यानंतर एडन मार्कराम आणि रोमॅरियो शेफर्ड यांनी डाव सावरला. शेफर्डचा (२४) चहलने त्रिफळा उडवला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने १४ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ४० धावांची फटकेबाजी केली. मार्करामने अर्धशतक ठोकले खरे, पण तोपर्यंत उशीर झाला होता. त्याने ५ चौकार आणि २ षटकारांसह ५७ धावांची झुंज दिली. हैदराबादचा संघ २० षटकात ७ बाद १४९ धावा करू शकला. राजस्थानकडून चहलने २२ धावांत ३ तर कृष्णा आणि बोल्ट यांनी प्रत्येकी २ बळी टिपले.
राजस्थानचा डाव
जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी राजस्थानच्या डावाची सुरुवात केली. हैदराबादचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारने पहिल्या १० मिनिटांतच बटलरला यष्टीपाठी झेलबाद केले होते, पण भुवनेश्वरने टाकलेला चेंडू नो बॉल होता. त्यामुळे बटलरला जीवदान मिळाले. बटलर-जयस्वालने पहिल्या गड्यासाठी ५८ धावांची भागीदारी रचली. रोमॅरियो शेफर्डने जयस्वालला (२०) बाद करत राजस्थानला पहिला धक्का दिला. त्यानंतर उमरान मलिकने बटलरला झेलबाद केले. बटलरने ३ चौकार आणि ३ षटकारांसह ३५ धावा केल्या. त्यानंतर देवदत्त पडिक्कल आणि कप्तान संजू सॅमसनने अर्धशतकी भागीदारी रचली. पडिक्कलने २९ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ४१ धावा ठोकल्या, उमरानने त्याचा त्रिफळा उडवला. संजूने आक्रमक अंदाजात अर्धशतक ठोकले. त्याने २७ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांसह ५५ धावा केल्या. १७व्या षटकात भुवनेश्वरने संजूला माधारी धाडले. शेवटच्या षटकात स्फोटक फलंदाज शिमरोन हेटमायरने १२ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह ३२ धावा कुटल्या, त्यामुळे राजस्थानला दोनशेपार धावा करता आल्या. २० षटकात रॉयल्स संघाने ६ बाद २१० धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
- IPL 2022 SRH vs RR : धू-धू-धुलाईच..! पुण्यात घोंगावलं सॅमसन वादळ; हैदराबादला २११ धावांचं आव्हान!
- ‘म्होरक्या’ निलेश रसाळ यांचा मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात डंका!
- कात्रज परिसरात धक्कादायक घटना; तब्बल २५ गॅस सिलेंडरचा स्फोट
- IPL 2022 : “सचिन, मी किंवा गौतमनं असे शॉट खेळले असते?”, सेहवागनं शुबमन गिलला सुनावलं!
- “शेतकऱ्यांना ‘तो’ कारखाना परत द्यावा”- किरीट सोमय्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

