मुंबई: IPL 2022 च्या २५ व्या सामन्यात, केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली, हैदराबादने कोलकात्याचा ७ गडी राखून पराभव केला. सोबतच हंगामातील त्यांच्या सलग विजयांची हॅट्ट्रिक केली. शुक्रवारी दोन्ही संघ आमनेसामने होते. पण, ऑरेंज आर्मी वेगळ्याच रंगात रंगलेली दिसली. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने सनरायझर्स हैदराबादसमोर १७६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात १३ चेंडू बाकी असताना SRH ने ३ गडी गमावून हे लक्ष्य गाठले. यासोबतच केन विल्यमसनने एका नव्या यादीत एंट्री केली आहे.
केकेआरविरुद्ध (KKR) सामन्यात १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादचा (SRH) कर्णधार केन विल्यमसनकडून (Kane williamson) मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण, या सामन्यात त्याचा डाव फारसा कामी आला नाही आणि तो अवघ्या १७ धावा करून बाद झाला. जरी कर्णधाराची ही खेळी छोटी होती. पण, यानंतरही त्याने आयपीएलमध्ये नवा विक्रम निश्चितच नोंदवला आहे.
कर्णधार केन विल्यमसनने आयपीएलमध्ये त्याच्या २००० धावा पूर्ण केल्या आहेत. आयपीएलमध्ये २००० किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो न्यूझीलंडचा दुसरा फलंदाज आहे. केनच्या आधी असे करणारा पहिला ब्रॅंडन मॅक्युलम (Brandon Mcullam) आहे ज्याने १०९ सामन्यांत २८८१ धावा केल्या आहेत. केनने ६८ सामन्यांमध्ये हा विक्रम केला आहे. त्याने एकूण २००९ धावा केल्या ज्यात १८ अर्धशतकेही झळकावली आहेत.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- करूणा मुंडेंना अवघे ६१ मते, निवडणूक रद्द करण्याची मागणी
- IPL 2022: “तो आला आणि त्याने गेम पालटला” ; हैदराबादकडून पराभवानंतरही अय्यरने केले ‘या’ खेळाडूचे कौतुक
- IPL 2022: रसेलच्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाल्यानंतर भडकला विल्यमसन; VIDEO होतोय व्हायरल!
- IPL 2022: विजयाची हॅट्रिक केल्यानंतर कॅप्टन केन खुश; म्हणाला “आम्ही इम्प्रुव्ह…”
- “…तर भाजपचा भस्मासुर झाल्याशिवाय राहणार नाही”, रुपाली ठोंबरेंचा इशारा


