मुंबई: IPL 2022 च्या २५व्या सामन्यात हैदराबादने कोलकात्याला (KKR vs SRH) ७ विकेट्सने पराभूत केले. ज्यात गेल्या सामन्यात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसणारा कर्णधार केन अवघ्या १७ धावा करून आंद्रे रसेलच्या चेंडूवर क्लीन बोल्ड होऊन माघारी परतला. यात विशेष म्हणजे नेहमी कुल दिसणारा केन यावेळी विकेट पडल्यानंतर भडकलेला दिसला.
झाले असे की, १७६ धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादची (SRH) सुरुवात अपेक्षेप्रमाणे चांगली झाली नाही. दुसऱ्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर अभिषेक शर्माने त्याची विकेट दिली. पण, दुसऱ्या टोकाकडून केन विल्यमसन क्रीजवर सेट झाला. मात्र पॉवरप्लेच्या शेवटच्या चेंडूवर त्याला आंद्रे रसेलने (Andre russell) क्लीन बोल्ड केले. विकेट पडल्याचे लक्षात येत केन (kane williamson) खूपच निराश दिसला.
रसेल की गेंद पर चकमा खाए kane williamson, गंवाया अहम विकेटhttps://t.co/7UyxFJ5cN8
— Shilpi sharma (@Itsshilpisharma) April 15, 2022
केनच्या विकेटचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओत तो विकेट पडल्याचा राग स्वतःवर काढत पॅव्हेलियनमध्ये परतताना दिसत आहे. मागील दोन सामन्यांत त्याने आपल्या फलंदाजीत कमालीचे सातत्य दाखवले होते आणि शानदार खेळी खेळली होती. मात्र या सामन्यात त्याला मोठी खेळी करता आली नाही.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022: विजयाची हॅट्रिक केल्यानंतर कॅप्टन केन खुश; म्हणाला “आम्ही इम्प्रुव्ह…”
- “…तर भाजपचा भस्मासुर झाल्याशिवाय राहणार नाही”, रुपाली ठोंबरेंचा इशारा
- “…तर स्वार्थासाठी धर्माचा वापर करणाऱ्यांसाठी त्यांनी गदा हातात घेतली असती”, रोहित पवारांचा विरोधकांवर निशाणा
- “राष्ट्रवादीच्या रिमोटवर काँग्रेसचा सेल टाकून शिवसेनेचा गेम सुरु”, केशव उपाध्येंचा खोचक टोला
- “सत्तेपुढे शिवसेनेचे हिंदुत्व गौण”, राष्ट्रवादीच्या ‘त्या’ निर्णयावरून केशव उपाध्येंचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

