Share

IPL 2022: “तो आला आणि त्याने गेम पालटला” ; हैदराबादकडून पराभवानंतरही अय्यरने केले ‘या’ खेळाडूचे कौतुक

Published On: 

मुंबई: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सला (KKR vs SRH) आयपीएल २०२२ मध्ये २ सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मोसमातील हैदराबाद विरुद्ध सामन्यात कोलकात्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे. केकेआरने सनरायझर्ससमोर १७६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. जे हैदराबादने १७.५ षटकात अवघ्या ३ विकेट्स गमावत गाठले. या पराभवानंतर श्रेयस अय्यरने आपल्या संघाच्या कामगिरीवर प्रतिक्रिया दिली आहे.

पराभवानंतर श्रेयस अय्यर (shreyas iyer) म्हणाला, ” खूप थकल्यासारखे वाटत आहे, मला वाटले की आपण बोर्डवर चांगले स्कोर ठेवू. खरे सांगायचे तर, राहुल त्रिपाठी (rahul tripathi) आला आणि त्याने सामना पालटला आणि आम्हाला सेटल होऊ दिले नाही. चेंडू सीम होत असल्याने त्यांच्या गोलंदाजांनी त्याचा फायदा घेत चांगली गोलंदाजी केली. फलंदाज म्हणून आम्ही पॉवरप्लेच्या शेवटपर्यंत गेलो. फलंदाजी युनिट म्हणून चांगला प्रयत्न केला. बॉलिंग युनिट म्हणून आजचा दिवस अगदी साधारण होता.”

आयपीएल २०२२ मधील कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) हा तिसरा आणि सलग दुसरा पराभव आहे. त्यामुळे आतापर्यंत टॉप २ मध्ये राहिलेला कोलकाता चौथ्या स्थानावर घसरला आहे. तसेच संघाच्या डेथ बॉलिंगबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. केकेआरच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली मात्र गोलंदाजीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!