Share

“…तर मनसे स्टाइलने तुमचा भोंगा बंद करू”; मनसेचा राऊतांना बॅनर लावून इशारा

Published On: 

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून शिवसेना विरुद्ध मनसेमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या आठवड्यापासून शिवसेना खासदार संजय राऊत व मनसे दररोज एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडत असताना पाहायला मिळत आहे. आता शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आजच मनसेने सामना कार्यालयाच्या बाहेर जुना फोटो लावून संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. या फोटोमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर राज समर्थकांकडून राऊत यांची गाडी फोडण्यात आली होती. तोच जुना फोटो बॅनरवर लावला आहे व याची पुनरावृत्ती हवी का? असा सवाल करत थेट टीका केली आहे.

संजय राऊतांवर मनसेने लावलेल्या बॅनरमधून थेट टीकास्त्र सोडल्याचे पाहायला मिळत आहे. “तुम्ही ओवेसी कोणाला बोलता, संजय राऊत तुमचा कर्कश्श भोंगा बंद करा. याचा त्रास संपूर्ण महाराष्ट्राला होतोय. नाहीतर मनसे स्टाइल तुमचा भोंगा बंद करू”, असे लिहून संजय राऊत यांची गाडी पलटी केल्याचा फोटो लावला आहे.  फोटो खाली मोठ्या अक्षरात पुन्हा वृत्ती हवी का? असा प्रश्न देखील मनसेने केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!