कोल्हापूर : उत्तर कोल्हापूर पोटनिवडणूकीसाठी १२ एप्रिल रोजी मतदान पार पडले. आज १६ एप्रिल रोजी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली, तर भाजपतर्फे सत्यजित कदम हे मैदानात आहेत.
दहाव्या फेरीअखेर जाधव यांना ४२ हजार ५५५ मत मिळाली आहेत. भाजपच्या सत्यजित कदम यांना ३१ हजार ५३२ मत मिळाली आहेत. जाधव हे ९००० मतांनी आघाडीवर आहेत. याशिवाय माध्यमातील सर्वात चर्चित चेहरा म्हणजे करुणा मुंडे या देखील निवडणूकीत आपले नशीब आजमावत आहेत. मात्र निवडणुकीत त्यांना अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. कारण १० मतमोजणीच्या फेऱ्यांनंतर त्यांना अवघे ६१ मते मिळाली आहेत.
निवडणूक रद्द करण्याची करुणा मुंडे यांची मागणी-
दरम्यान आज सकाळी करूणा मुंडे या मतमोजणी केंद्रावर दाखल झाल्या होत्या. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी निवडणूक रद्द करायची मागणी केली. निवडणुकीत आचारसंहितेचा भंग झाला आहे, त्यामुळे आपण याप्रकरणी न्यायालयात जाणार आहोत, असे मुंडे म्हणाल्या.
“मतदारसंघात पैसे वाटताना पक्षाचं लोक पकडले गेले आहेत. इथे काँग्रेस आणि भाजपकडून ४० लाखांहून अधिक खर्च झाले आहे. याची तक्रार मी निवडणूक आयोगाकडे केली आहे. या निवडणुकीत आधीच माझा विजय झाला आहे. राजकारणात प्रस्थापित होण्यासाठी या निवडणुकीची मदत झाली आहे. यासाठी मी देवाचे आभार मानते. मी हरुनही जिंकणारी बाजीगर आहे, ” असे करून मुंडे म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

