मुंबई: सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR vs SRH) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात सनरायझर्सने केकेआरवर ७ गडी राखून सहज विजय मिळवला. त्यामुळे हैदराबादने सलग ३ सामन्यात ३ विजय नोंदवून ६ गुण मिळवले असून गुणतालिकेत ते सातव्या स्थानावर आले आहेत. केकेआरविरुद्ध मोठा विजय नोंदवल्यानंतर, हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन खूप आनंदी दिसत आहे आणि त्याने आपल्या खेळाडूंचे कौतुक केले आहे.
विजयानंतर केन (Kane williamson) म्हणाला, “केकेआरविरुद्ध (KKR) लवकर विकेट घेणे महत्त्वाचे होते. थोडे ड्यू होते जे आमच्यासाठी उपयुक्त ठरले. डेथ बॉलिंगही उत्कृष्ट होती. राहुल त्रिपाठी (Rahul tripathi) अप्रतिम होता आणि एडन मार्कम सुद्धा वेगळ्या भूमिकेत दिसला. भुवनेश्ववरसह मलिकनेही (umran malik) उत्तम प्रदर्शन केले. तो प्रत्येक चेंडू १५० किलोमीटरच्या वेगाने टाकतो. ज्यामुळे त्याच्या चेंडूवर बऱ्याचदा चौकार जातात. पण या सामन्यात त्याने धीर धरला. अशा अनेक छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ज्यावर आम्ही काम करू शकतो आणि संघाचे खेळाडूही त्यावर काम करत आहेत. आम्ही इम्प्रुव्हमेंट पाहत आहोत.”
पहिल्या डावात फलंदाजी करताना केकेआरने हैदराबादसमोर १७६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ज्याचा पाठलाग सनरायझर्सच्या फलंदाजांनी अवघ्या १७.५ षटकात ३ गडी गमावून केला.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- “…तर भाजपचा भस्मासुर झाल्याशिवाय राहणार नाही”, रुपाली ठोंबरेंचा इशारा
- “…तर स्वार्थासाठी धर्माचा वापर करणाऱ्यांसाठी त्यांनी गदा हातात घेतली असती”, रोहित पवारांचा विरोधकांवर निशाणा
- “राष्ट्रवादीच्या रिमोटवर काँग्रेसचा सेल टाकून शिवसेनेचा गेम सुरु”, केशव उपाध्येंचा खोचक टोला
- “सत्तेपुढे शिवसेनेचे हिंदुत्व गौण”, राष्ट्रवादीच्या ‘त्या’ निर्णयावरून केशव उपाध्येंचे टीकास्त्र
- एवढं धडधडीत खोटं बोलण्याची ‘ऊर्जा’ कुठून मिळते?; भातखळकरांचा नितीन राऊत यांना टोला


