🕒 1 min read
चंदीगड : नुकतंच पंजाबमध्ये प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला यांची हत्या झाली. मुसेवाला यांची सुरक्षा हटवण्यात आल्यानंतर त्याच्या २४ तासात त्यांची हत्या झाली होती. यामुळे पंजाबमध्ये सुरक्षा हा विषय चर्चेला आला आहे. मुसेवाला यांच्या हत्येच्या एक दिवस आधी पंजाब सरकार ४२४ लोकांची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय धाडसी निर्णय घेतला होता. मात्र आता या विषयावर न्यायालयाने पंजाब सरकारला फटकारले आहे. तसेच सुरक्षा काढून घेण्याची लिस्ट लीक झाल्याबद्दलही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली जात आहे.
आता पंजाबच्या नवनिर्वाचित भगवंत मान सरकारने पुन्हा ४२४ लोकांना सुरक्षा बहाल करावी, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. ७ जूनपासून या सर्वांची सुरक्षा पुन्हा पूर्वरत होणार आहे. दरम्यान, एका मर्यादित आणि विशिष्ट कालावधीसाठी काही व्हीआयपींची सुरक्षा हटवली होती, यावर पंजाब सरकारने भर दिला होता. मात्र, एखाद्याची सुरक्षा हटवायची असली तरी परिस्थितीचा योग्य आढावा घ्यावा. सर्व बाजूंनी योग्य विचारविनिमय व्हायला हवे, तरच तसा निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
काही दिवसांपूर्वी पंजाब सरकारने जवळपास ४२४ व्हीआयपी लोकांची सुरक्षा मागे घेतली होती. या ४२४ व्हीआयपी लोकांमध्ये राजकीय व्यक्ती , निवृत्त अधिकारी तसेच सध्या कार्यरत असलेले काही पोलीस कर्मचारी आणि धर्मगुरू अशा लोकांचा समावेश होता. याआधी एप्रिलमध्येही पंजाब सरकारने १८४ लोकांची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मुलगा रणिंदर सिंग, काँग्रेस आमदार प्रताप सिंह आणि बाकीच्या नेत्यांचाही समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
