Share

करमाळा तालुक्यातील कुगाव येथे हनुमानाचा जन्म झाल्याचा दावा

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर : आतापर्यंत महाराष्ट्रात हनुमान चालीसा आणि लाऊडस्पीकरवरुन वाद सुरू होता. हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही तोच आता हनुमानाच्या जन्मस्थानावरून वाद सुरू झाला आहे. हनुमान जन्मस्थानासंदर्भात मंगळवारी नाशिकमध्ये धर्मसंसदेचे आयोजन करण्यात आले होते. त्र्यंबकेश्वर, कर्नाटक, सोलापूर येथून सुमारे 20-25 साधू-संत धर्मसंसदेत उपस्थित होते. या संसदेत साधू-संतांमध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले.

या युद्धात आता करमाळा तालुक्यातील ग्रामस्थांनी उडी घेतली आहे. कुगाव येथे हनुमानाचा जन्म झाल्याचा दावा कुगाव येथील सीताराम महाराज बल्लाळ व कुगावचे माजी सरपंच धुळाभाऊ कोकरे यांनी केला आहे. जाणून घेऊया काय आहे प्रकरण
पद्मपुराणाचा ग्रंथाच्या 33 व्या अध्यायाचा दाखला देऊन हनुमानाचा जन्म कूर्मग्राम ( कुगाव ) येथे झाल्याचा उल्लेख आहे. कूर्म ग्राम म्हणजे आताचे कुगाव आहे. असा दावा येथील हनुमान मंदिराचे भक्त सीताराम महाराज बल्लाळ व माजी सरपंच धुळाभाऊ कोकरे यांनी केला आहे. हनुमानाच्या जन्म स्थळावरुन नवीन-नवीन दावे केले जात आहेत. त्यामुळे हा वाद संपण्याचे नाव घेत नाही आहे. देशात महाराष्ट्रासहीत आंध्र प्रदेश, झारखंड, गुजरात, शिवमोगा, या ठीकाणी हनुमान जन्माचे दावे केले जात आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!