Share

“शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेतो म्हणून माझ्यावर टीका केली”- शरद पवार

Published On: 

सोलापूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनसे नेते राज ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. “मूळ प्रश्नांना बगल देऊन भलत्याच गोष्टींकडे समाजाला वळवून स्वतःचा स्वार्थ साधत काही घटकांनी निकाल घेतला आणि त्या गोष्टीला प्रसिद्धी मिळते हे खेदजनक आहे. शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेतो म्हणून एका नेत्याने माझ्यावर टीका केली. मग नावं कुणाची घ्यायची? आज श्रीलंकेत दंगा सुरू आहे. दुसरीकडे पाकिस्तानमध्ये पंतप्रधानांना जावं लागलं, मात्र हिंदुस्थान एवढा मोठा देश आहे. अनेक भाषा, अनेक जाती आहेत. त्यामुळे हा एकसंघ राहिला याचं कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आहे”.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, “माझी खात्री आहे की भटक्या-विमुक्त जातीजमातींसाठी काम करणारी तुमची संघटना या दिशेने काम करेल. येणारी पिढी शिक्षित व समृद्ध होईल, न्यायासाठी प्रसंगी संघर्ष करेल व आपला मूलभूत अधिकार आपल्या पदरामध्ये पाडून घेऊन आपले जीवनमान बदलेल. यासाठी सदैव प्रयत्नशील राहणं, ही आपली जबाबदारी आहे”.

“महाराष्ट्रामध्ये अनेक जातीजमाती आहेत. आपला देश स्वतंत्र झाला असला तरी त्या स्वातंत्र्याचा खरा अर्थ अजूनही त्यांच्या घरांपर्यंत पोहचलेला नाही. अशा वर्गांसाठी आपण अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण या जातींचं दुखणं अजून कमी झालेलं नाही. या भटक्या-विमुक्त जाती,जमातींनी एकत्र यायचे असेल तर त्यांचे संघटन केले पाहिजे”.

हे संघटन भक्कमरीत्या टिकवून ठेवण्यासाठी कुवत असलेला नेता असायला हवा. हिरालाल राठोड यांच्या रूपाने तो नेता या समाजाला मिळालेला आहे. अर्थात या सर्वच मागण्या एकत्रितरीत्या पूर्ण करणं सरकारलाही अवघड आहे. त्यामुळे त्यावर प्राधान्यक्रमाने काम करायला हवं. राज्य मंत्रिमंडळामध्ये ज्या मंत्र्यांचा या मागण्यांशी प्रत्यक्ष संबंध येतो, त्यांची आपण एक बैठक बोलवू. त्या बैठकीत अर्थमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे उपस्थितीत असतील, असेही शरद पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!