Share

“ज्यादिवशी आमचे सरकार महाराष्ट्रात येईल…”, राज ठाकरेंनी केला बाळासाहेब ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओ ट्वीट

Published On: 

मुंबई:  मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीसमोरील भोंग्याबाबत ३ मेचा अल्टीमेटम दिला होता. अन्यथा ४ तारखेपासून  हनुमान चालीसा वाजवण्याचे आदेश त्यांनी मनसैनिकांना दिले होते. दरम्यान आज पहाटे नागपूर आणि ग्रामीण भागात तसेच राज्यातील अनेक भागात मशिदींमध्ये आवाजाची मर्यादा पाळण्यात आल्याचे दिसून आले. तत्पूर्वी राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) मशिदीवरील भोंग्याबाबत भूमिका मांडताना दिसून येत आहेत.

“ज्यादिवशी आमचे सरकार महाराष्ट्रात येईल, त्यादिवशी आम्ही रस्त्यावरील नमाज पढणे बंद केल्याशिवाय राहणार नाही. कारण धर्म असा असावा लागतो, जो राष्ट्र विकासाच्या आड येता कामा नये. लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये. हिंदू धर्माचा कुठे उपद्रव होत असेल त्यांनी आम्हाला येऊन सांगावे, आम्ही बंदोबस्त करूत. माशिदिवरील लाऊडस्पीकर खाली येतील.”, असे बाळासाहेब ठाकरे या व्हिडिओमध्ये म्हणतात दिसून येत आहेत.

दरम्यान राज ठाकरे यांनी काल एक पत्रक प्रसिद्ध करत “आम्ही आमचा हट्ट सोडणार नाही, त्यांना एकदा हनुमान चालीसा ऐकवाच” असं म्हणत माघार घेण्यास साफ नकार दिला आहे. तसेच “महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करतो की, कै. हिंदूहदयसम्राट, शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी सर्व भोंग बंद झालेच पाहिजेत, हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात; की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार साहेब यांचे ऐकणार आहात? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊन जाऊ दे.”, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यातच हा व्हिडिओ ट्वीट करत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या:  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!