Share

“अनाधिकृत भोंग्याविरोधात कारवाई करण्याची हिंमत नसल्याने मविआ…”, केशव उपाध्येंचा टोला

Published On: 

मुंबई: राज्यात सध्या भोंग्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टीमेटमची मुदतही आज संपली आहे. त्यातच काल त्यांनी एक पत्रक प्रसिद्ध करत “आम्ही आमचा हट्ट सोडणार नाही, त्यांना एकदा हनुमान चालीसा ऐकवाच” माघार घेण्यास साफ नकार दिला आहे. दरम्यान राज ठाकरेंविरोधात औरंगाबाद येथे गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना अटक होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवरच भाजप नेते केशव उपाध्ये (keshav upadhye) यांनी थेट मविआ सरकारवर निशाणा साधला आहे.

“एका दिवसांत ८०० मशिदीवरील भोंग्यांना परवानगी देण्यात येते म्हणजे कालपर्यंत हे सगळं अनाधिकृत सुरू होतं याची कल्पना सरकारला होती. मूळात कायद्याचं पालन सर्वांनीच करणं गरजेचे आहे. कायदा हा सर्वांसाठी एकसमान आहे. मग अनाधिकृत भोंग्याविरोधात कारवाई करण्याची हिंमत महाविकास आघाडी सरकारमध्ये नाही म्हणून अशाप्रकारे विरोधकांना अडकवण्याचा कटकारस्थान करत आहेत.”, असा आरोप केशव उपाध्ये यांनी केला आहे.

तसेच “सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करत अनाधिकृत भोंगे उतरवावेत असं आवाहन राज ठाकरेंनी केले. मात्र सरकार त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत आहे. त्यात हनुमान चालीसा वाजवतील म्हणून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. शरद पवारांचे चाहते आणि शिवसेनेतील राष्ट्रवादीचे प्रवक्ते संजय राऊत विनाकारण लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून धार्मिक तेढ निर्माण होणारी वक्तव्य करत आहेत. राज्यात कुठेही दंगलसदृश्य परिस्थिती नाही. तरीही उगाच दंगल, तेढ, अशांतता अशी विधानं करून सरकारचं धार्मिक तेढ निर्माण करण्याचं राजकारण तर करत नाही ना अशी शंका उपस्थित होते.”, असेही उपाध्ये यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!