Share

“काही ठिकाणी कमी आवाजात तर काही ठिकाणी भोंग्याविना नमाज पठन”, सामाजिक सलोख्याचे घडले दर्शन

Published On: 

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीसमोरील भोंग्याबाबत ३ मेचा अल्टीमेटम दिला होता. अन्यथा ४ तारखेपासून हनुमान चालीसा वाजवण्याचे आदेश त्यांनी मनसैनिकांना दिले होते. त्यानुसार त्यांच्या अल्टीमेटमची मुदत आज संपली. मात्र आज सामाजिक सलोखा जपत राज्यातील औरंगाबाद, नाशिक, नागपूर, कोल्हापूर या जिल्ह्यांत शांततेत नमाज पठन करण्यात आली.

नागपूर येथे अनेक मशिदीसमोर कमी आवाजात नमाज पठन करण्यात आली. तर औरंगाबाद, नाशिक, नागपूर, कोल्हापूर या जिल्ह्यांत काही ठिकाणी भोंग्याशिवायच नमाज पठन करण्यात आली आहे. तर पंढरपूरमधील मशिदींमधूनही आज सकाळच्या अजानसाठी लाऊडस्पीकरचा वापर केला गेला नाही. सामाजिक सलोख्याचे भान बाळगणारी ही भूमिका प्रशंसनीय असल्याचे   मनसेने म्हटले आहे. तर दुसरीकडे अनेक मनसे सैनिकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

दरम्यान राज ठाकरे यांनी काल एक पत्रक प्रसिद्ध करत “आम्ही आमचा हट्ट सोडणार नाही, त्यांना एकदा हनुमान चालीसा ऐकवाच” असं म्हणत माघार घेण्यास साफ नकार दिला आहे. तसेच “महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करतो की, कै. हिंदूहदयसम्राट, शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी सर्व भोंग बंद झालेच पाहिजेत, हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात; की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार साहेब यांचे ऐकणार आहात? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊन जाऊ दे.”, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. दरम्यान राज ठाकरेंच्या आवाहनानंतर पोलिसांनीही सतर्कतेची भूमिका घेत अनेक मशिदीसमोर तगडा बंदोबस्त ठेवला आहे.

महत्वाच्या बातम्या:  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!