Share

“राज ठाकरेंना अटक करून दाखवाच”; सदाभाऊ खोतांचे उद्धव ठाकरेंना आव्हान

Published On: 

मुंबई: तुम्ही एकदा राज ठाकरेंना अटक करून दाखवा. तुमच्यात काय धमक आणि हिंमत आहे, हे महाराष्ट्राला पाहायचे आहे. एकदा काय ते मैदान होऊन जाऊ दे, असं आव्हान माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारला इस्लामपूरच्या मरळनाथपूर येथे बोलत असताना दिले.

“जर कोण हनुमान चालीसा म्हणणाऱ्याला तुरुंगात घालायला गेला तर, आम्ही शर्यतीच्या माध्यमातून गदा हातात घेतली आहे. ती गदा तुमच्या डोक्यात घालू आणि ही गदा हनुमानाची आहे, हे याद राखावं. तसेच आमचं हिंदुत्व खरं हिंदुत्व आहे, लेचे-पेचे नाही. असे म्हणणारे आता हनुमान चालीसा कोणी म्हणायला लागल्यावर त्यांची चड्डी पिवळी होते? याचं उत्तर त्यांनी महाराष्ट्राला द्यावं, अशा शब्दांत खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

राज्यातील सरकार हे वेड्यांचं सरकार आहे. रोज सत्ताधारी पक्षाचे टीव्हीवर येतात. कुणाला मातीत गाडू म्हणतात, कुणाला महाराष्ट्रातून उद्ध्वस्त करू म्हणतात, अगदी खालच्या पातळीवर जाऊन शिवराळ भाषा वापरतात, लोकप्रतिनिधींच्या अंगावर जातात. मुख्यमंत्रीही धमकीची भाषा करतात. आम्ही शांत बसणार नाही, योग्य उत्तर दिलं जाईल, आम्हाला आडवा येईल त्याला गाडलं जाईल, असं बोलतात. म्हणजे हे सरकार गुंडांचं सरकार आहे. पोलिसांच्या माध्यमातून विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम करत आहे, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!