Share

Shivaji Adahrao Patil : पुढील 15 दिवसात अख्खी शिवसेना आमच्यासोबत येणार; आढळराव पाटलांचं सर्वात मोठं विधान

Published On: 

🕒 1 min read

Shivaji Adahrao Patil । मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याच्या राजकारणात मोठा बदल झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ५० आमदार घेऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडले. पुढे त्यांनी भाजपशी हातमिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केलं. मात्र या सर्व घडामोडी घडताना मागील काही दिवसांत शिवसेना पक्ष चांगलाच अडचणीत सापडला आहे. आमदारानंतर आता १२ खासदारांनी देखील एकनाथ शिंदे यांना समर्थन दर्शवल आहे. त्यातच आता माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी मोठा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

आढळराव पाटील बोलताना म्हणाले की, अनेक शिवसैनिक मला भेटून माझ्या निर्णयाचे स्वागत करत आहेत. आम्ही शिवसेना सोडलेली नाही, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले नाहीत, हिंदुत्वाचे विचार सोडले नाहीयंत. त्यामुळे आम्ही काही चूक केली किंवा पक्ष सोडलायं किंवा आम्ही गद्दारी केली असे अजिबातच नाहीयं. सर्वांना हा माझा निर्णय पसंत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून होणारी गळचेपी आणि होणारा अत्याचार हा सगळया शिवसैनिकांनी भोगालंय. पुढील पंधरा दिवसात सगळी शिवसेनासोबत राहणार आहे, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारासोबत राहणार आहे. यामध्ये कोणतीही अडचण नाही, असं ते म्हणाले.

दरम्यान, याआधी गेल्या काही दिवसांपूर्वी शिवाजी आढळराव पाटील यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती अनावधानाने प्रसिद्ध झाली अशी कबुली शिवसेनेकडून देण्यात आली आहे. आढळराव पाटील हे शिवसेनेतच कार्यरत आहेत असेही सांगण्यात आले आहे. या सर्व बाबींवर आता आढळराव पाटील यांनी सवाल उपस्थिती केला आहे. चुकीनं हकालपट्टी होण्याएवढा मी छोटा माणूस आहे का ? असा प्रश्न आढळरावांनी उपस्थिती केला होता.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!