🕒 1 min read
महाराष्ट्र देशा डेस्क : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असतो. तो हिंदीबरोबरच मराठी फिल्म इंडस्ट्रीचा आवडता अभिनेता आहे. एका मुलाखतीदरम्यान त्याने सांगितले की, “मला माझ्या भूमिकांमध्ये प्रयोग करण्याची संधी मिळाली. वडील विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना देखील मी सेक्स कॉमेडी चित्रपटामध्ये अभिनय केला होता. मुले मोठी झाल्यावर या चित्रपटांबद्दल काय विचार करतील याची मला अजिबात पर्वा नाही”, असे देखील तो म्हणाला.
रितेशने मस्ती, ग्रँड मस्ती, क्या कूल हैं हम आणि क्या सुपर कूल हैं हम यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.रितेशने खासगी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मी एकमेव अभिनेता आहे ज्याने 4-5 सेक्स कॉमेडीज केल्या आहेत आणि मला याची थोडीशीही लाज वाटत नाही. या चित्रपटांबद्दल माझी मुले भविष्यात काय विचार करतील, याचा मी कधीच विचार केला नाही. मी हे चित्रपट केले तेव्हा माझे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. माझ्या आई-वडिलांनी हे नको करू, ते नको करू, असे म्हटले नाही. त्यांनी मला हव्या त्या गोष्टी निवडण्याचे स्वातंत्र्य दिले. माझ्या मुलांबद्दल बोलायचं तर त्यांना माझ्या कामाबद्दल काहीही माहित नाही”.
मुलांविषयी बोलताना रितेश म्हणाला कि, “माझ्या मुलांना अजूनही समजलेले नाही की चाहते आणि फोटोग्राफर्स माझ्यासोबत फोटो का काढतात. त्यांना स्टारडम म्हणजे काय ते समजत नाही. प्रसिद्धी ही तात्पुरती गोष्ट आहे. आपण ज्याला प्रसिद्धी समजतो तो केवळ एक भ्रम आहे. माझी मुले शाळेत जातात आणि त्यांचे मित्र सांगतात की तुमचे वडील स्टार आहेत. मी माझ्या मुलांना त्यांच्या मित्रांना सांगायला सांगतो की माझे वडील घर चालवण्यासाठी आणि कुटुंबाचे मनोरंजन करण्यासाठी दररोज कामावर जातात”.
महत्वाच्या बातम्या:
- County Cricket : चेतेश्वर पुजाराच्या द्विशतकावर इंग्लंड फिदा, केलं भव्य स्वागत; पाहा VIDEO!
- Raj Thakrey : राज ठाकरेंची विचारपूस करण्यासाठी गायिका आशाताई ‘शिवतीर्थ’ वर
- Vijay devarkonda | विजय देवरकोंडाच्या ‘लिगर’कडून चाहत्यांना आहे ‘ही’ अपेक्षा; लवकरच होणार रिलीज
- Rupali Patil : चित्रा वाघ यांचं डोके ठिकाणावर आहे का ?; रुपाली पाटलांचा संतप्त सवाल
- Chitra Wagh | मला घाण भाषेत बोललं जात आहे, मेसेज केले जात आहेत – चित्रा वाघ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
