Share

महाविकासआघाडी आणि भाजपमध्ये समझोता? राज्यसभा बिनविरोध होण्याचे चंद्रकांत पाटलांकडून सूचक…

Published On: 

 मुंबई :  राज्यसभा निवडणुकीच्या रणनितीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असल्याने आत हि लढत अटीतटीची होणार असे म्हटले जात होते. परंतु आता यावर सर्वपक्षीय तोडगा काढण्यात येत आहे. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वपक्ष प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडी शिष्टमंडळाने या संदर्भात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ” महाविकास आघाडीच्या नेत्यांचा काल देवेंद्र फडणवीसांना निरोप आला की, तिन्ही पक्षांचे नेते भेटायला येणार आहेत. आज तिन्ही पक्षांचे नेते भेटायला आले. आमच्या पक्षाच्या वतीने देवेंद्र फडणवीस आणि मी होतो. राज्यसभेची निवडणूक १० जून रोजी होणार आहे. गेल्या २० वर्षांची परंपरा आहे की, राज्यसभा – विधान परिषदेत जर निवडणुका झाल्या तर क्रॉस वोटिंग होतं आणि प्रचंड गोंधळ होतो. पण ज्यावेळी बिनविरोध होते त्यावेळी वस्तूस्थितीच्या आधारे होते.”

“आमचा आग्रह आहे की, राज्यसभेच्या तीन जागा भाजपला मिळाव्या आणि विधानपरिषदेच्या निवडणुकांच्या बाबतीत काही विचार करता येईल. मविआच्या नेत्यांनी खूप चर्चा झाल्यावर तोच प्रस्ताव मांडला की, भाजपने राज्यसभेचा तिसरा उमेदवार मागे घेतला आणि विधानपरिषदेला भाजपचा ४ चा कोटा आहे त्याऐवजी पाचवी जागा आम्ही देऊ. आम्ही सांगितलं की, आमचा राष्ट्रीय पक्ष आहे आणि राज्यसभा जास्त महत्त्वाची असते,” असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!