🕒 1 min read
मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत जात सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे पंढरपूरला जाण्यापूर्वी त्यानी पुण्यात प्रमोद भांगीरे यांच्या वॉर्डाला भेट दिली. यावेळी कार्यकर्ते हे पूर्ण जल्लोषाच्या तयारीत असताना एकनाथ शिंदे यांनी जल्लोष साजरा n करण्याचे आवाहन केले. पवित्र अमरनाथला झालेल्या ढगफुटी मध्ये पुण्यातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा जल्लोष साजरा करू नका अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. मी तुम्हाला भेटायला पुन्हा येईल पण आता कोणता जल्लोष साजरा करू नका, असे मुख्यमंत्री म्हणाले.
“मी आणि माझ्याबरोबर असलेले ५० आमदार यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली आहे. त्याचबरोबर धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण पुढे घेऊन चाललो आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा जो हिंदुत्वाचा विचार आहे तो सर्वांना माहीत आहे. या राज्याला प्रगती प्रथावर घेऊन जाण्यासाठी तसेच राज्य सुजलाम सुफलाम करण्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही नक्की करून तसा प्रामाणिक प्रयत्न देखील करू. तसेच आज दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा तसेच राष्ट्रपती यांची देखील भेट घेतली. राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकार पूर्णपणे पाठिंबा देईल असे देखील आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिलेले आहे.” असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
“अमरनाथ येथे ढगफुटिमुळे जी घटना घडली आहे, त्यात पुण्यातील २ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोणीही जल्लोष करू नये. मी तुम्हाला या ठिकाणी भेटण्यासाठी आलेलो आहे. आपण सगळे माझ्यासाठी खूप वेळ थांबले होते, मी आपण सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. मला आषाढी एकादशीनिमित्त वेळेत पोहोचायचं आहे. तुम्ही जे प्रेम माझ्याबद्दल दाखवल आहे, त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांचा आभारी आहे. यावेळी अमरनाथ यात्रेत जी घटना घडली त्यात एकही प्राण जायला नको होता. मात्र यामध्ये पुण्यातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
