Share

Abdul Sattar : “राऊतांनी आईची शपथ…” ; बंडखोर आमदारांनी ५० कोटी घेतल्याच्या आरोपावर अब्दुल सत्तार संतापले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर पक्षातील अनेक आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला. यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते. शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी यादरम्यान बंडखोर आमदारांवर कडाडून टीका केली होती. एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांवर त्यांनी वेगवेगळे आरोपही केले होते. शिवसेनेच्या आमदारांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून दबाव टाकण्यात आलेला असल्यामुळे हे आमदार अगोदर गुजरातला आणि नंतर गुवाहाटीला गेले आहेत असे संजय राऊत अनेक वेळा म्हणाले. यानंतर शिवसेनेत बंड पुकारलेल्या प्रत्येक आमदाराला ५० कोटी रुपये देण्यात आल्याचा आरोपही राऊतांनी केला. याच मुद्द्यावरून एकनाथ शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी आईची शपथ घेऊन सांगावं की खासदार होण्यासाठी किती कोटी दिले. असा थेट सवाल अब्दुल सत्तार यांनी संजय राऊत यांना केला आहे.

अब्दुल सत्तार यांना ५० कोटी मिळाले आहेत का असे विचारले असता सत्तार म्हणाले, संजय राऊत यांनी आई बापाची शपथ घेऊन सांगावं की खासदार होण्यासाठी किती कोटी दिले. त्यामुळे एकनाथ शिंदे हे आता आमचे मुख्यमंत्री आहेत, ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. माझ्याकडे सध्या खूप मोठा पद आहे ते म्हणजे एका कार्यकर्त्याचं पद. मागील चार दिवसांत विकासासाठी भरपूर निधी मिळाला आहे असेही यावेळी सत्तार म्हणाले. सर्वसामान्यांना जसा मुख्यमंत्री आवास असेच एकनाथ शिंदे हे आहेत त्यामुळे हे सर्वसामान्यांचे सरकार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर पक्षाचे जवळपास ४० आमदार शिंदे सोबत सरकारमधून बाहेर पडले. त्यानंतर बंडखोर आमदारांवर संजय राऊत यांनी मोठ्या प्रमाणात टीका केली होती. तसेच बंडखोर आमदारांनी ही शिवसेनेतील बंड करण्यामागचे कारण संजय राऊत यांना ठरवले आहे. शिवसेनेची व्यवस्था संजय राऊत यांच्यामुळे झाले असल्याचीही बंडखोर आमदारांनी अनेक वेळा म्हटले आहे. संजय राऊत हे आमच्या जीवावर निवडून येऊन आम्हालाच वेडी वाकडी भाषा वापरतात असेही बंडखोर आमदार या अगोदर म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!