🕒 1 min read
हैदराबाद : आमदार आणि माजी कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज हैदराबाद शहरातील गांधी भवन येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याची टीका केली. यादरम्यान यशोमती ठाकूर यांनी इतर अनेक मुद्दे मांडले. अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्यावर देखील त्यांनी आरोप केले.
यशोमती ठाकूर म्हणाल्या, काँग्रेस पक्ष कधीही दहशतवादावर राजकारण करण्याच्या बाजूने नव्हता. पण आज जी परिस्थिती आहे आणि ज्या प्रकारे एकापाठोपाठ एक घटनांमधून दहशतवादी आणि गुन्हेगार भाजपशी जोडले गेले आहेत. त्यावर प्रश्न विचारणे आवश्यक आहे. तुम्हीही विचार करा आणि समजून घ्या की, राष्ट्रवादाच्या नावाखाली भाजप देशाशी घृणास्पद खेळ करत आहे.
“अलीकडेच, उदयपूरमधील कन्हैया लाल यांच्या हत्येतील आरोपींपैकी एक ‘मोहम्मद रियाझ अटारी’ हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचे निष्पन्न झाले. भाजप नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाचे सदस्यत्व घेतले. रियाझने भाजप नेते आणि माजी मंत्री गुलाबचंद कटारिया यांचे जावई आणि राजस्थान विधानसभेचे माजी नगरसेवक अतुल चंडालिया यांच्या कारखान्यात काम केल्याचेही मीडिया रिपोर्टमध्ये उघड झाले आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह भाजपच्या अनेक कार्यक्रमांमध्ये ते दिसून आले आहे. महाराष्ट्रातील अमरावती येथील केमिस्ट उमेश कोल्हे यांच्या हत्येचा कथित सूत्रधार इरफान खान याचे अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांच्याशी संबंध असल्याचेही मीडिया रिपोर्टमध्ये उघड झाले आहे. आणि राणा दाम्पत्याचे भाजपशी काय नाते आहे, हे कोणापासून लपून राहिलेले नाही. इरफान खान राणा दाम्पत्याचा प्रचार करून मते मागायचा,” असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.
जम्मू-काश्मीरमध्ये गावकऱ्यांनी पकडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांपैकी एक तालिब हुसेन शाह हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांसोबत फोटो आहे. जेव्हा त्याला पकडले गेले तेव्हा तो पवित्र अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंवर हल्ला करण्याचा कट रचत होता.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
