Share

नेस्को कोरोना काळजी केंद्राची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी

Published On: 

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गोरेगाव येथील नेस्को मैदानावर उभारण्यात येत असलेल्या कोरोना काळजी केंद्र २ (CCC 2) व्यवस्थेची  (दिनांक १५ मे २०२०) सकाळी पाहणी केली.

मुख्यमंत्री आणि मान्यवरांनी नेस्को मैदानावर सभागृह क्रमांक २ व ३ या ठिकाणी करण्यात आलेल्या व्यवस्थेची प्रामुख्याने पाहणी केली. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) जयस्वाल यांनी मुख्यमंत्री महोदयांना नेस्को केंद्रावर करण्यात येत असलेल्या तयारीची सविस्तर माहिती दिली.

विधानपरिषद निवडणूक : भाजपच्या उमेदवाराने गुन्ह्य़ाची माहिती लपवली ? प्रतिज्ञापत्रावरून नवे वादळ

यावेळी राज्याचे उद्योग, खनिकर्म व मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल, सहआयुक्त (विशेष) आनंद वागराळकर, पी/दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवीदास क्षीरसागर, प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत) विजय पाचपांडे, विशेष कार्य अधिकारी देवेंद्र जैन तसेच  मिलिंद नार्वेकर हे यावेळी उपस्थित होते.

मास्क न घालता फिरणाऱ्या 85 नागरिकांना दंड

एकूण १,२४० बेड क्षमता असलेले हे संपूर्ण केंद्र असणार आहे. याठिकाणी ऑक्सिजन पुरवठादेखील उपलब्ध असेल. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे आणि स्नानगृहे, गिझर यासह प्रत्येक बेडला स्वतंत्र पंखा दिले जाणार आहेत. पुरेसे वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका नेमण्यात येणार आहेत. संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या तयारीबाबत समाधान व्यक्त केले.

#KeepItUpchallenge : युवीने दिले सचिन, रोहित, हरभजनला ‘हे’ खतरनाक चॅलेंज

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!