औरंगाबाद : औरगाबाद शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणावर मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांवर औरंगाबाद महापालिकेची कारवाई सतत सुरू असून आज सलग दुसऱ्या दिवशी एकूण 85 नागरिकांवर कारवाई करून 43500 रुपय दंड आकारण्यात आले. सदरील कारवाई मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडये यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्या निगराणीत नागरिक मित्र पथक चे कर्मचारी आणि वॉर्ड अधिकारी यांच्या समन्वयाने 09 प्रभागात पार पाडण्यात आली. काल देखील या प्रकारची कारवाईत 92 विना मास्क लावून फिरणारे नागरिकांकडून 46,000 रुपये दंड वसूल करण्यात आला होता.
Covid -19 आजाराचा प्रसार रोखण्यासाठी, केंद्र सरकारनं आज मास्क वापरणं अनिवार्य करणं तसंच थुंकण्यावर पूर्ण बंदी घालणारे निर्देश जारी केले आहेत. सार्वजनिक तसंच कामाच्या ठिकाणीही मास्कचा वापर अनिवार्य आहे. ५ पेक्षा जास्त जणांनी एकत्र येण्यावर सरकारनं यापूर्वीच बंदी घातली आहे.
कामगारांसाठी सॅनिटायझर आणि ताप मोजणी करणं आवश्यक असल्याचंही सरकारनं जाहीर केलं आहे. कामगारांना सामाजिक सुरक्षित अंतर पाळून काम करता येईल अशी सोय व्यवस्थापन करावी तसंच कामगारांच्या दोन पाळ्यांमध्ये किमान एका तासाचं अंतर ठेवण्याची सुचना सरकारनं केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

