Share

विधानपरिषद निवडणूक : भाजपच्या उमेदवाराने गुन्ह्य़ाची माहिती लपवली ? प्रतिज्ञापत्रावरून नवे वादळ

Published On: 

नागपूर : विधानपरिषदेच्या निवडणुकीत अतिशय चर्चा ज्यांच्या उमेदवारीची झाली ते म्हणजे प्रवीण दटके यांची.मात्र आता ते नव्या वादात सापडले असून निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात फौजदारी गुन्ह्याची माहिती लपवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

विधानसभा लोकप्रतिनिधींद्वारा विधानपरिषदेच्या ९ सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. या नऊ सदस्यांविरोधात कुणीही प्रतिस्पर्धी नसल्याने सर्वाचा विजय निश्चित आहे. भाजपकडून रणजितसिंह मोहिते-पाटील,गोपीचंद पडळकर,रमेश कराड आणि माजी महापौर प्रवीण दटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांनी विधानपरिषद सदस्य पदासाठी अर्ज दाखल केला.

#मजुरांचे_हाल : ही पण आपलीच माणसं आहेत, भाजप खासदाराचे गृहमंत्री अमित शहांना पत्र

नागपूर शहरातील अजनी पोलीस ठाण्यात व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे वकील सतीश उके यांनी ही तक्रार दाखल केली आहे.दटके यांनीअर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी विविध गुन्हे व संपत्तीची माहिती दिली. पण, २००६ मध्ये त्यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एका गुन्ह्य़ाची माहिती त्यांनी दिली नाही असा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, प्रवीण दटके यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याविरूद्ध प्रलंबित असलेल्या फौजदारी खटला क्रमांक 321/2006 बद्दलची माहिती लपविली आहे. ७ वे संयुक्त नागरी न्यायाधीश, कनिष्ठ विभाग आणि न्यायिक दंडाधिकारी, प्रथम श्रेणी, नागपूर यांच्यासमोर खटल्याची माहिती देणे त्यांचे कर्तव्य होते. हे निवडणूक कायद्यांतर्गत चुकीचे प्रमाण आहे. दटके यांचा उमेदवारी अर्ज नाकारला जाऊ शकतो. प्रवीण दटके देखील कायद्यानुसार फौजदारी कारवाईस जबाबदार आहेत, असे उके यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

आता काही खरंं नाही ! अभिजित बिचुकलेंनी लिहिले पंतप्रधान मोदींना पत्र

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!