Share

#KeepItUpchallenge : युवीने दिले सचिन, रोहित, हरभजनला ‘हे’ खतरनाक चॅलेंज

Published On: 

क्रिकेट : कोरोनाच्या काळात अनेकजण घरी बसून आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवत आहेत. तर काहीजण आपले स्वास्थ्य राखण्याचा प्रयत्न करत आहेत. असाच प्रयत्न आपले टीम इंडियाचे खेळाडू देखील करत आहेत. प्रत्येकजण आपल्या घरी राहून फिटनेस मेंटेन करत आहे. अशातच युवराज सिंगने आपल्या टीम मेट्स यांना चॅॅलेंज देण्यस सुरवात केले आहे. त्याने आपल्या पहिल्या चॅलेंजसाठी सचिन तेंडूलकर, रोहित शर्मा आणि हरभजन सिंग यांची निवड केली आहे.

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगनं सोशल मीडियावर #KeepItUp challenge ही मोहीम सुरू केली आहे. गुरुवारी युवीनं एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात तो बॅट आणि चेंडू यांच्यातील ताळमेळ राखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यावेळी त्यानं बॅट आडवी पकडली आहे. त्यांनी आता सचिन, रोहित व भज्जीला चॅलेंज दिलं आहे. पण, त्यानं भज्जीची फिरकी घेतली. तो म्हणाला,”हा टास्क सचिन आणि रोहित यांच्यासाठी सोपा आहे, परंतु भज्जीसाठी अवघडच आहे.

https://twitter.com/YUVSTRONG12/status/1260931470048129024?s=20

कोरोनामुळे क्रिकेटचे नियोजित सामने रद्द झाले आहेत. त्यामुळे खेळाडू सध्या घरी बसून आपल्या टीम मेट्स बरोबर व्हिडीओ चॅॅटद्वारे सवांद साधत आहेत. तर यावेळी अनेक देशांचे खेळाडू सहभागी होत आहेत.

दरम्यान देशातील कोरोना रुग्णांची संख्या 82,103 वर पोहोचली आहे. 27,977 रुग्ण बरे झाले असले तरी 2649 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशा या कठीण प्रसंगात स्वतःला शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्त ठेवणं प्रत्येकाच्या हातात आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!